कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते ऍड. पंडितराव सडोलीकर यांचे निधन....

progressive movement  Activists  Adv Panditrao Sadolikar death in Kolhapur
progressive movement Activists Adv Panditrao Sadolikar death in Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीचे एक सच्चे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले ऍड.पंडितराव सडोलीकर (वय 61) यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. सिटी क्रिमिनल प्रक्‍टीशनरस्‌ बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होत. कोल्हापुरातील विविध आंदोलनात, कृती समितीमध्येही ते सक्रीय राहत होते. 


ऍड.सडोलीकर हे नाव कोल्हापुरातील पूरोगामी चळवळीत आदराने घेतले जाते. हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून येवून त्यांनी कोल्हापुरात मध्ये आपले स्वतंञ स्थान निर्माण केले होते. साधेपणा, नम्रता,वंचीत घटकांच्या विषयी आपुलकी हे त्यांचे विशेष गुण होते. सिटी क्रिमिनल प्रक्‍टीशनरस्‌ बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते. सध्या ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेश सचिव होते. शहरातील नागरी कृती समितीचे सक्रिय सदस्य होते. एक चांगला सामाजिक कार्यकत्ता, सामाजिक भान असणारा वकिल आपण आज गमावल्याची भावना जिल्ह्यातील वकिलांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनामुळे आज वकिलांनी कामकांज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड.विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.रणजित गावडे यांनीही आदरांजली वाहिली आहे. मध्यरात्री त्यांचे निधन झाल्यानंतर क्रांतीसिंह नानापाटील नगर परिसरातील गंधर्वनगरातील आयडियल रेसिडेन्सि मध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा ऍड.राहूल आणि रोहित यांच्यासह आई,वडील,पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (6) सकाळी आहे.

 
संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com