जयसिंगपूरमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

Property Tax Exemption For Ex-servicemen In Jaysingpur Kolhapur Marathi News
Property Tax Exemption For Ex-servicemen In Jaysingpur Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : माजी सैनिक व पत्नी, विधवा पत्नीला मालमत्ता कर माफ करणे, ओल्या कचऱ्यातून बायोगॅस प्रकल्प उभारणे, माजी आमदार उल्हास पाटील व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून शववाहीका घेणे, अपंगाना राखीव निधी देणे, नगरपालिकेच्या फिल्टर हाऊसची दुरुस्ती करणे यासह 26 विषयांना पालिकेच्या सोमवारी झालेल्या ऑनलाईन सभेत मंजूरी दिली. नगराध्यक्षा डॉ.निता माने अध्यक्षस्थानी होत्या. 

मुख्याधिकारी टिना गवळी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यामध्ये चार सफाई कर्मचाऱ्यांना पदावर नियुक्ती करणे, शहरात दररोज पाच टन ओला कचरातून बायोगॅस प्रकल्प उभारणे, 2019-20 अंतर्गत माजी आमदार उल्हास पाटील व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून शववाहीका खरेदी करणे, शहरात माजी सैनिकांना व त्यांच्या पत्नी, विधवा पत्नींना मालमत्ता कर माफी देणे, दसरा चौकातील स्टेडीयम ग्राऊंड सुशोभिकरण करणे, अपंग लाभार्थ्यांसाठी पाच टक्‍केप्रमाणे राखीव 7 लाखाचा निधी वर्ग करणे.

बहूलक्षेत्र विकास अंतर्गत प्रभाग 6 मधील जैन बस्ती ते स्टेडीयममधील बोळ रस्त्यातील पेव्हींग ब्लॉग बसवणे कामाला मुदत वाढ देणे, 2021-22 चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रस्ताव, तसेच कर योग्य मुल्याच्या दरात बदल करणे, परवाने शिवाय कृष्णा नदीतून बिगर सिंचन ग्राहक पिण्याच्या पाण्याची थकबाकी भरणे, पालिकेचे फिल्टर हाऊस येथील इमारतीचे ट्रक्‍चर ऑडीट करणे व फिल्टर हाऊस दुरूस्त करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वच्छता मित्र पुरस्काराच्या रकमेस मंजूरी देणे, मनिषा ऑटोमाबाईल ते नांदणी मार्गामार्गावरील विद्युतवाहिनी व ट्रान्स्फर्म स्थलांतर करणे.

अरीहंत कॉलनी येथे भुयारी गटर करणे, राजर्षी शाहू स्टेडीयमध्ये 12 हायमॅक्‍स दिवे बसवणे, शहरात बालसंस्कार वर्ग सुरू करणे यासह विविध 26 विषयांना एक मताने मंजूरी दिली. उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com