इचलकरंजीत डाव्या लोकशाही आघाडीतर्फे धरणे आंदोलन 

protest in kolhapur ichalkaranji
protest in kolhapur ichalkaranji

इचलकरंजी - सर्वसामान्य नागरिकांना मेटाकुटीला आणणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात डावी लोकशाही आघाडीच्या वतीने गांधी पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीत करत विविध धोरणांचा धिक्कार करण्यात आला. गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. तसेच इंधनाच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ थांबवावी, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, कृषीविषयक कायदे मागे घेण्यात यावे, सर्वांना चांगले व मोफत शिक्षण मिळावे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. 

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात दैनंदिन वाढ होत चालली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडल्याने नागरिकांनाचे जगणे कठीण बनले आहे. केंद्रसरकारने नवीन कृषी विषयक कायदे आणल्याने कृषीक्षेत्रात खासगी कंपन्यांची घुसखोरी केली जात आहे. अशा केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात डावी लोकशाही आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, केंद्र सरकारने इंधन दरातील सातत्याने होणारी दरवाढ थांबवावी, वाढती महागाईला आळा घालावा, सर्वसामान्यांसाठी आरोग्य व्यवस्था बळकट करावी, स्त्रियांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शासन व्हावे, सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात माकपचे दत्ता माने, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, आनंदराव चव्हाण, ए. बी. पाटील, हणमंत मुत्तुर, सुभाष कांबळे, भाकपचे हणमंत लोहार, मारुती आजगेकर, शिवाजी जाधव, महेश लोहार, लालनिशाण पक्षाचे धोंडीबा कुंभार, सुनिल बारवाडे, राजू शेलार, जनता दल सेक्युलरचे पद्माकर तेलसिंग, जावेद मोमीन, सौ. उषा कांबळे, सिकंदर मुल्ला, रफिक नाईकवडे, मिलिंद कांबळे, शेकापचे शिवाजी साळुंखे, स्वराज इंडियाचे इस्माईल समडोळे, सिकंदर मुल्ला आदी सहभागी झाले होते.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com