आमदार ऋतुराज पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली ही मागणी 

Public health benefits patients without symptoms MLA ruturaj patil  demand for health minister
Public health benefits patients without symptoms MLA ruturaj patil demand for health minister

कोल्हापूर : कोरोनाबाधित असलेल्या; पण लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा, कोरोना पॅकेजची रक्कम वाढवावी, जनआरोग्य योजनेत कोल्हापुरातील आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याची परवानगी द्यावी, योजनेत असलेल्या सर्वच रुग्णालयांत कोरोना उपचाराची परवानगी द्यावी, कोरोना काळात रुग्णालयांच्या ग्रेडिंगचा विचार न करता सरसकट उपचाराची रक्कम द्यावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली.


सध्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांवरही उपचार होत आहेत. पण ज्या कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणे नसतील, अशा रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तरी अशा रुग्णांनासुद्धा या योजनेत समाविष्ट करुन योजनेचा लाभ द्यावा. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्या रुग्णांना ऑक्‍सिजन बेड तसेच व्हेंटिलेटरच्या सुविधा द्याव्यात. पॉझिटिव्ह अहवाल हाच आधार ग्राह्य धरून सर्व प्रकारचे उपचार व्हावेत व त्याबाबतच्या उपचारासाठी आर्थिक लाभसुद्धा या रुग्णांना मिळावा. 


जिल्ह्यात सर्व खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दराने कोरोना उपचाराबाबतचे बिल आकारावे, असा नियम केलेला आहे. असे असले तरी शासकीय नियमाप्रमाणे होणारे बिल आणि या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक पॅकेजमध्ये  तफावत आहे. हे आर्थिक पॅकेज श्वसनाशी संबंधित वेगवेगळ्या वीस आजारांवर आधारित आहे. कोल्हापुरातील  शासकीय व खासगी रुग्णालये ही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य  योजनेमध्ये समाविष्ट आहेत. यापैकी  रुग्णालयांमध्येच कोरोनाबाबतचे उपचार केले जातात. यामधील उर्वरित इतर रुग्णालयांना काही अटी शिथिल करुन कोरोनावर उपचार करण्याबद्दल सुविधा देण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com