esakal | विश्वासार्हता टिकवून बदल स्विकारले तरच पत्रकारितेला नवी दिशा मिळेल : सम्राट फडणीस

बोलून बातमी शोधा

Publication of the book Journalism Research and Enlightenment written by Sachin Vaikule at Shivaji University kolhapur marathi news}

समाज ऐकणं हे माध्यमांच काम असतं. पत्रकारिता करताना आलेल्या प्रश्नांचा शोध आणि बोध वायकुळे यांच्या पुस्तकात आहे.

विश्वासार्हता टिकवून बदल स्विकारले तरच पत्रकारितेला नवी दिशा मिळेल : सम्राट फडणीस
sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून झपाट्याने बदलत चाललेले तंत्रज्ञान हे माध्यमांपुढचे आव्हान असेल. फेक न्यूज हा मोठा धोका पुढे असून, विश्वासार्हता टिकवून बदल स्विकारले तरच पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पुणे 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी आज येथे केले. 
शिवाजी विद्यापीठात पत्रकार सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. साहित्यिक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षस्थानी होते. मानव्यशास्त्र इमारतीच्या सभागृहात कार्यक्रम झाला.


 फडणीस म्हणाले, "पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दल मूळ पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी लिहिणे महत्त्वाची गोष्ट आहे. चांगला पत्रकार बनायचं असेल तर गाव ते जग असा परिघ ठेवणे, गरजेचे आहे. पत्रकारिचा हा प्रश्न समजून घ्यायचा अन् उत्तर शोधायचा व्यवसाय आहे.

हेही वाचा- कसबा तारळेतील नऊ जणांवर गुन्हा : बाळूमामांच्या पालखीत सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांना फाटा

डॉ. लवटे म्हणाले, "पत्रकारिता हा फक्त सिद्धांत नाही, तर तो व्यवहार असतो. परंतू तत्त्वांना धरुन पत्रकारितेचा लोकव्यवहार व्हायला हवा. समाज ऐकणं हे माध्यमांच काम असतं. पत्रकारिता करताना आलेल्या प्रश्नांचा शोध आणि बोध वायकुळे यांच्या पुस्तकात आहे."उपायुक्त विनायक औंधकर यांनी एखाद्या विषयाकडे विविध अंगांनी पाहण्याचा दृष्टिकोन पत्रकारितेतून येत असतो, असे सांगितले. यावेळी डॉ. रत्नाकर पंडित, मिरज-कुपवाड नगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. श्रीहरी देशपांडे, प्रा. डॉ. शिवाजी जाधव, भाग्यश्री कोसाटे उपस्थित होते.


संपादन- अर्चना बनगे