पुणे पदवीधर निवडणूक प्रचाराची खुन्नस सोशल मीडियावर

लुमाकांत नलवडे | Saturday, 28 November 2020

कोल्हापूर ः पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार आता वेगळ्या वाटेवर येत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येते. भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. मात्र, आता मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्युत्तराने प्रचारात अधिक खुन्नस आली आहे. कॉल सेंटरवरून आलेल्या प्रचाराच्या कॉलला प्रत्युत्तर देऊन त्याचे रेकॉर्डिंग करून उमेदवारांचा काट्याने काटा काढला जात आहे. हेच रेकॉर्डिंग आता "इन्स्टाग्राम'सारख्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कॉल सेंटरवरून कॉल येतो. पुणे पदवीधर मतदार संघातील...... यांना मतदान करा. यावर संबंधित मतदाराने त्यांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी सांगत आहात. त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे उसाचे बिल दिले नाही. तुम्ही त्या ठिकाणी असता तर काय केले असते ? कॉल सेंटरवरून बोलणारी व्यक्ती (मुलगी) शांत राहते. तुम्ही पुणे पदवीधर मतदार संघातील मतदार आहात काय ? कॉल सेंटरवरून "होय' असे उत्तर मिळते. त्यावर मतदार म्हणतो, तुम्ही.... यांना मतदान करा. करणार की नाही ? यावर कॉल सेंटरमधील व्यक्ती म्हणते "होय'. 
कॉल सेंटरमधून ज्या उमेदवाराला मतदान करा म्हणून सांगितले जात होते. त्याच कॉल सेंटरमधील व्यक्तीने थेट मी विरोधक उमेदवाराला मतदान करते, असे सांगितले आहे. ज्याचा प्रचार केला जात होता. त्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्याचे मान्य केले. आणि त्यामुळे हीच क्‍लिप आता व्हायरल झाली आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारातून आपल्या उमेदवाराचा प्रचार करून उमेदवाराचा काट्याने काटा काढला जात आहे. गैर काहीच नसल्याचे दाखविले आहे. मात्र, यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात वेगळ्या वळणावर पोचण्याची शक्‍यता वाढली आहे. 

दृष्टिक्षेपात प्रचार 
ऑफलाईन मतदान, प्रचार मात्र डिजिटल 
डिजिटल रेकॉर्डिंगद्वारे मतदानाचे उमेदवारांचे आवाहन 
मॅसेजद्वारे पसंती क्रमांक उमेदवारांपर्यंत पोचविले. 
लिंक देऊन अधिक मतपत्रिकेचे स्वरूप मतदारांपर्यंत पोचविले 
मतदारांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन एसएमएसद्वारे 
नाव, बूथ क्रमांक, मतदानाचे ठिकाण, वेळ, ही मतदारांच्या मोबाइल स्क्रिनवर 

मिम्स्‌चा वापर कमीच... 
मिम्स्‌ हे एक कार्टुन पद्धतीने मनोरंजन आणि दर्जेदार प्रचाराचे साधन मानले जाते. मात्र, अद्याप तरी मिम्स्‌चा वापर येथे झालेला नाही. यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत आणि काही विषयांवर टिपण्णी करण्यासाठी याचा वापर कोल्हापुरात जबरदस्त झाला. "हॅलोऽऽ... पी. ए. बोलतोयऽऽऽऽ' हे मिम फार गाजले. सध्या "पदवीधर' आणि "शिक्षक' मतदार विधान परिषदेची निवड डिजिटल प्रचारावर होत आहे. मात्र, त्यामध्ये मिम्स्‌चा अभाव दिसतो.

Advertising
Advertising

संपादन - यशवंत केसरकर