अहवाल यायच्या आधीच क्वारंटाईन व्यक्ती घरी

The Quarantine Person Is At Home Before The Report Arrives Kolhapur Marathi News
The Quarantine Person Is At Home Before The Report Arrives Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्‍यात आज एकाच वेळी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यांतील आठ बाधित आणि अहवालाच्या प्रतीक्षेतील दोघांना संस्थात्मक क्वारंटाईन संपले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना अहवाल येण्यापूर्वीच त्यांना घरी पाठवायची किंवा जाण्याची ही कसली घाई, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. हीच घाई आता संबंधितांच्या कुटुंबांसह गावेही धोक्‍यात आणण्यासाठी कारणीभूत ठरणार की काय अशी भीतीही नागरिकांत आहे. प्रशासनाने सूचना देऊनही घेतलेला हा निर्णय किती महागात पडू शकतो, हे आता आगामी वेळच ठरवणार आहे. 

तालुक्‍यातील कळवीकट्टेतील एका क्वारंटाईन व्यक्तीला घरी पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाने क्वारंटाईनची नियमावली घालून दिली. क्वारंटाईनचा कालावधी संपला असला तरी संबंधिताचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत असेल, तर त्याला संस्थात्मक अलगीकरणातच ठेवावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. घरी सोडण्याची घाई न करण्याचा सल्लाही दिला आहे.

तरीसुद्धा आज आढळलेल्या 14 पैकी 8 लोकांना क्वारंटाईनचा कालावधी संपला म्हणून एक-दोन दिवसांपूर्वी घरी सोडले. कोणाला कुठे आणि कसे क्वारंटाईन करायचे याचे सर्वाधिकार ग्राम समितीला देण्यात आले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे माहीत असूनही स्थानिक समितीने क्वारंटाईन व्यक्तींना घरी सोडण्यास इतकी गडबड कशासाठी करायची, असा सवाल गावातील नागरिकच आता करत आहेत. केवळ एका गावातील दक्षता समितीनेच क्वारंटाईन कालावधी संपला तरी रिपोर्ट आल्याशिवाय घरी न सोडण्याची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.

काही क्वारंटाईन व्यक्ती दक्षता समितीसमोर घरी सोडण्याचा आग्रह धरतात. अशावेळी समितीचाही नाईलाज होतो. काही ठिकाणी दक्षता समितीकडून लोकांना घरी पाठविण्याचा प्रकार घडतो; परंतु घरी पाठवल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर किती महागात पडू शकते, याचे गांभीर्य सर्वांना असणे आवश्‍यक आहे. 

मुळात कोरोनापासून घरातील वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले गेले असतानाही अशा घाईने याच घटकांना धोक्‍यात लोटण्याचा प्रकार चिंताजनक ठरला आहे. आता बाधित असलेल्या आणि घरी गेलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यासह स्वॅब घ्यावा लागणार आहे. ही संख्या आता कितीपर्यंत जाणार याचीही चिंता असून यापुढे तरी अशा प्रकारांना प्रशासनाने कडक प्रतिबंध करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

लक्षणे नसणाऱ्यांचाही स्वॅब घ्या 
पुणे, मुंबईसह रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचा लोंढा वाढल्याने स्वॅब संकलन आणि तपासणी यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांचेच स्वॅब घेण्याचे ठरले. लक्षणे नसलेले, परंतु रेड झोनमधून आलेले लोक बरेच आहेत. आज बाधित आढळलेल्या लोकांमध्येही कोरोनाची कोणतीच लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तसे असेल तर लक्षणे नसणाऱ्यांचेही स्वॅब घेणे अत्यावश्‍यक ठरत असल्याचे मत ग्राम दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com