राज्याचे पाच मंत्री होणार क्‍वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण व गृहमंत्री बोम्मई यांनीही कॅमेरामनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी रविवारी (ता. 26) माध्यमांशी संवाद साधला होता.

बंगळूर : एका खासगी कन्नड वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या राज्याच्या पाच मंत्र्यांना क्वारंटाईनमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, डॉ. सी. एन. अश्‍वत्थनारायण, गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा, पर्यटन मंत्री सी. टी. रवी, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के सुधाकर व गृहमंत्री बसवराज बोम्मई अशी त्यांची नावे आहेत. 

उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण व गृहमंत्री बोम्मई यांनीही कॅमेरामनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांनी रविवारी (ता. 26) माध्यमांशी संवाद साधला होता. आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार कोरोनाबाधित कॅमेरामन 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कृष्णा निवासस्थानी गेला. त्याने 21 एप्रिल रोजी दुपारी 12.15 वाजता पुन्हा कृष्णाला भेट दिली. तिथे त्याने दोन उपमुख्यमंत्र्यांसह पर्यटनमंत्री रवी यांचे बाईट्‌स घेतले. गृहमंत्री बोम्मई कारमध्ये असताना त्यांचेही काही बाइट घेतले. 
तर 22 रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांची मुलाखत घेतली. त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास गृहनिर्माणमंत्री सोमण्णा यांची मुलाखत घेतली. परंतु, मंत्री सोमण्णा यांची मुलाखत घेताना खबरदारी घेण्यात आली होती, असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे पण वाचा - मरण स्वस्त झाले..... माणुसकीही थिजली! 

कॅमेरामनची पत्नी व त्याच्या अडीच वर्षाच्या मुलाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पाही त्याच्या थेट संपर्कात आलेले नाहीत. प्राथमिक व दुय्यम संपर्कातील व्यक्तींचा चाचणी अहवाल येईपर्यंत वरील मंत्र्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकऱ्यांनी सांगितले. मंत्री रवी, गृहमंत्री बोम्मई व डॉ. सुधाकर यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, अन्य मंत्र्यांनी त्यांचे नमुने चाचणीसाठी दिले की नाही, याबाबत समजू शकले नाही. बुधवारी तीन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. हे मंत्री 25 ते 29 एप्रिल दरम्यान मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या बैठकांना हजर होते. कॅमेरामन इतर अनेक मंत्र्यांच्याही संपर्कात आला होता. त्या सर्वांना गरज असल्यास चाचणी देण्याचा पर्याय दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांच्या पथकाने दिली.

हे पण वाचा -   ...शासनाचा कोणताही कर भरणार नाही! उद्योजकांचा निर्धार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarantine will be for five ministers of karnataka