म्हणुन 'या' तहसीलदारांनी चक्क चिखलात उतरून केली भाताची लागण...

radhanagri Tehsildar planted paddy in the mud
radhanagri Tehsildar planted paddy in the mud

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) - राधानगरी हा पाण्याचा तालुका असला तरी जेमतेम जमिनी, अत्यल्प भूधारक शेतकरी आणि डोंगर उतारावरची खाचरात होणारी पिकं. यात शेतकरी कसं जमवून घेतो, भात रोप लागण कशी करतो याचा अनुभव आज येथील तहसीलदार मीना निंबाळकर यांनी घेतला. अभयारण्य क्षेत्रातील कारिवडे येथे प्रत्यक्ष चिखलात उतरून त्यानी रोप लागण केली आणि आज त्या शेतकरी बनल्या.

ज्या तालुक्यात आपण नोकरी करतो ज्या तालुक्याच्या आपण पालक अधिकारी आहोत. तिथे लोक कसे जीवन जगतात याची अनुभूती त्यांना मिळाली. आज रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी राऊतवाडी धबधबा पर्यटन बंदी असताना पर्यटक आलेत काय याची पाहणी करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तिथून जवळच असलेल्या कारिवडे गावांमध्ये आणि त्या परिसरात रोप लागणीला वेग आला आहे. भाताची रोप कशी करतात, चिखलामध्ये रोपं कशी रूजतात याचे त्यांना कुतूहल वाटले.

सौ. निंबाळकर या मूळच्या सांगोल्याच्या असल्याने भात लागवड त्यांना नवीन होती. रस्त्या शेजारच्या भाताच्या खाचरात त्या स्वतः उतरल्या, रोप लागण करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि भाताची रोपे कशी लावायची याचे ज्ञान घेतले आणि त्यांच्याबरोबर त्या लावू ही लागल्या. याबाबत त्यांनी आलेला अनुभव अतिशय आनंदी असल्याचे सांगून या तालुक्यातील लोक कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत आणि मातीशी इमान राखून आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. खरेतर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि आनंदी वातावरणासाठी हा तालुका म्हणजे एक पर्वणी आहे असेही त्या म्हणाल्या. येथील शेतकऱ्यांचे जीवन राधानगरीच्या तहसीलदारांनी आज खऱ्या अर्थाने अनुभवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com