कोल्हापूर जिल्ह्यात तीन जुगार अड्डयांवर छापे

 Raids on three gambling dens in Kolhapur district Raids on three gambling dens in Kolhapur district
Raids on three gambling dens in Kolhapur district Raids on three gambling dens in Kolhapur district

कोल्हापूर ः गारगोटी मार्गावरील शेळेवाडी परिसरात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या 36 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 76 हजारांच्या रोकडसह 20 वाहने जप्त केली. दुसऱ्या कारवाईत पेठवडगाव येथील घरात तीनपानी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले. यात 69 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे; तर खोतवाडीतील जुगार अड्ड्यावर सहा जणांना अटक केली. व 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकूण ५१ जणांवर कारवाई करण्यात आली. रोख पावणे दोन लाख रुपये जप्त केले.

शेळेवाडीत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळात जुगार 
राशिवडे बुद्रुक ः गारगोटी मार्गावरील शेळेवाडी परिसरात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने छापा टाकला. येथे जुगार खेळणाऱ्या 36 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 76 हजारांच्या रोकडसह 20 वाहने जप्त केली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम राधानगरी पोलिस ठाण्यात सुरू होते. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती ः राधानगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेळेवाडी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज शहर पोलिस उपअधीक्षक कट्टे यांच्या पथकाने येथील कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. येथे जुगार खेळणाऱ्या 36 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 76 हजार रुपये रोकड, 19 मोटारसायकली, चारचाकी गाडी, 31 मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. ही कारवाई उपअधीक्षक कट्टे, शहर वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षक अनिता मेणकर, पोलिस कर्मचारी सचिन दुधाने, दयानंद पाटील, संदीप निळपणकर, राकेश मच्छाले, सुषमा नरतवडेकर, अमर अडुलकर, गौरव चौगुले यांनी केली आहे. 
शंकर रामा कांबळे , गणेश शंकर कांबळे, कृष्णा तुकाराम कांबळे ( आरळे ता. करवीर), देवेंद्र शिवाप्पा जावळे ( कळंबा कात्यायनी कॉम्प्लेक्‍स), किरण दिलीप बेडेकर (मंगळवार पेठ), दिलीप बबन गोसावी (शेळेवाडी) भीमाशंकर तुकाराम कांबळे( राजेंद्र नगर कोल्हापूर ) राजेंद्र गोविंद मंचर (मोरेवाडी), तानाजी विलास माने (कळंबा) रामचंद्र विलास व्हटकर (जवाहर नगर) दीपक आनंदा साठे( चंद्रे) , सुरेश धर्मापा मकणापूरे (मंगळवार पेठ); दत्तात्रय बळवंत देवकर ( ठिकपूर्ली), संभाजी वसंत पाटील (शेळेवाडी) तुकाराम मारुती सारंग (म्हासुर्ली) एकनाथ केशव कांबळे( शेळेवाडी) तानाजी लक्ष्मण पाटील (वडकशिवाले) संपत कृष्णात धुंदरे ( राशिवडे). नितीन श्रीपती गोधडे (कळंबा) संदीप रामचंद्र कांबळे (कुर्डू ) सुनील दत्तात्रेय कळस (संभाजीनगर) धनाजी महिपती साठे (चंद्रे) एकनाथ यशवंत सुतार' नारायण दत्तात्रय कारंडे ( बेले); संदीप यशवंत माने (कळंबा) नामदेव दत्तू कांबळे (माजगाव) मधुकर राजाराम पाटील, अमोल मोहन कानकेकर ( राशिवडे)' नीलेश नितीन महेंद्रकर (मंगळवार पेठ) दिलीप रामचंद्र कांबळे (कुर्डू ) अमर बाजीराव पाटील (हळदी ) सतीश आनंदा कांबळे (शेळेवाडी) सुशांत सूर्यकांत पोकर्णेकर (परिते) रामचंद्र सखाराम पाटील, राजाराम आनंदा कांबळे (परिते ) लक्ष्मण शंकर कुंभार ( राशिवडे) अशी ताब्यात घेतलेल्या यांची नावे आहेत. 


पेठवडगावमधील घरावर ठापा 
पेठवडगाव : येथील शिवाजी पुतळा परिसरातील एकाच्या घरात तीनपानी जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून नऊ जणांवर कारवाई करण्यात आली. यात 69 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वडगाव पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास केली. 
या प्रकरणी मुकेश जीवनदास लालवानी (वय 54, रा. दुधगाव, ता. मिरज, सांगली), यासीन मुबारक सुतार (35, रा. दुधगाव), बाळासो शिवाजी मोरे (43, रा. पेठवडगाव), इम्रानखान हमीदखान पठाण (40, रा. सावर्डे), मारुती नारायण कोळी (63, रा. टोप), बंडा महादेव बोटे (40, रा. पेठवडगाव), अशोक संभाजी पाटील (30, रा. इस्लामपूर), सुनील वसंत म्हेत्तर (51, रा. शिवाजी पेठ, पेठवडगाव), घरमालक संजय शिवाजी भोसले यांच्यावर कारवाई केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, दादा माने, संदीप गायकवाड, विशाल हुबाळे, धोंडिराम वड्ड यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 39 हजार 300 रोख रक्कम व मोटारसायकल, मोबाईल असा 69 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

खोतवाडीत सहा जणांना अटक 
इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. या कारवाईत 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात मोबाईल संच व दोन हजार 900 इतक्‍या रकमेचा समावेश आहे. या कारवाईत अटक केलेल्यांची नावे अशी ः विलास मारुती गोरूले (वय 45), गजानन लिंगाप्पा लोहार (36), अमोल पांडुरंग शिंदे (27), निखिल सुनील कांबळे (25), अंबादास नागेश कुंभार (27), सचिन बळवंत लोले (43, सर्व रा. खोतवाडी- तारदाळ). शनिवारी (ता. 10) रात्री ही कारवाई करण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com