रेल्वे रिझर्व्हेशनचे पैसे परत देणे सुरू

Railway reservations continue to be refunded
Railway reservations continue to be refunded

कोल्हापूर : लॉक डाऊनमुळे रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या रिझर्व्हेशनचे पैसे तब्बल 65 दिवसानंतर आजपासून मिळण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी रेल्वे तिकीट खिडकीतून 951 प्रवाशांना पाच लाख 53 हजार 265 रुपये परत देण्यात आले. रेल्वे स्थानकावर सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान हे पैसे परत मिळण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. पैसे परत घेण्यासाठी तिकीटाच्या तारखेपासून पुढे सहा महिन्यांत ते केंव्हाही परत मिळणार आहेत. 

कोल्हापूर-तिरुपतीसह कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउननंतर बंद करण्यात आल्या होत्या. प्रवाशांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच तिरुपतीचे आणि इतर राज्यांतील रिझर्व्हेशन केले होते. मात्र, रेल्वेगाड्याच रद्द केल्यामुळे प्रवास करणे अशक्‍य झाले. यानंतर केंद्र शासनाने सर्वांच्या तिकाटाचे पूर्ण पैसे परत करण्याचे जाहीर केले होते. ज्यांनी ऑनलाईन रिझर्व्हेशन केले होते. त्यांचे पैसे ऑनलाईनद्वारेच परत केले होते. काहींचे पैसे परत करणे शक्‍य झाले नाही. तसेच ज्यांनी रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर येऊन रिझव्हर्वेशन केले होते, अशा प्रवाशांचे पैसे परत मिळाले नव्हते. हेच पैसे देण्याची प्रक्रिया आजपासून रेल्वेस्थानकावर सुरू झाली. 

सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान तिकटी खिडकीवर दिवसभरात पंधरा-वीस मिनिटांती चार-पाच प्रवाशी रेल्वेस्थानकाच्या खिडकीवर भेट देत होते. प्रवाशांनी गर्दी करू नये यासाठी याची मुदत सहा महिने केली आहे. तसेच खिडकी समोर सोशल डिस्टन्ससाठी चौकोन आखणी केले होते. 

रिझर्व्हेशन सुरू नाही... 
केवळ केंद्र शासनाने सुरू केलेल्या मोजक्‍याच रेल्वे गाड्यांसाठीचेच बुकींग सध्या सुरू आहे. अनेक प्रवासी इतर गाड्याबाबत चौकशी करीत आहेत. मात्र, अद्याप तरी रेल्वेसाठी कोल्हापुरातून सुटणाऱ्या कोणत्याही गाडीचे रिझर्व्हेशन सुरू केलेले नाही. देशभरातील रिझर्व्हेशनही येथे होत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

लॉकडाउन काळात रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांचे रिझर्व्हेशनचे पैसे आजपासून परत देण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत परतावा देण्याचे काम सुरू होते. इतर जिल्ह्यातील, राज्यातील व्यक्ती येथे पैसे परत घेवू शकतात. 
- प्यारेलाल मीना, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com