कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम ; काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढविला 

Rains continue in Kolhapur district
Rains continue in Kolhapur district

राधानगरी - राधानगरी तालुक्‍यातील धरण क्षेत्रावर आज पावसाची उघडझाप आहे. राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदीत विसर्ग आज वाढवला. काळम्मावाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाच्या पाच वक्राकार दरवाजांपैकी तीन दरवाजे सायंकाळी चार वाजता किंचित उघडले यातून 1500 क्‍यूसेक विसर्ग सुरू आहे. पायथ्याच्या वीजगृहासाठी 1800 असे 3300 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या दूधगंगा नदी पात्रात सुरू आहे. हे धरण 88 टक्के भरले असून 22.50 टीएमसी साठा झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले आहेत. यातून व वीजनिर्मितीला असा 4256 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी धरण 83 टक्के भरले असून 2.89 टीएमसी साठा झाला आहे. 

3 दिवसांत 3 फूट पाणी कमी 

इचलकरंजी - पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यानंतरही पुराचे पाणी संथगतीने कमी होत आहे. गेल्या तीन दिवसांत केवळ 3 फूट पाणी कमी झाले आहे. दरम्यान, गेली तीन दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्यांने कमी होवून पूर ओसरेल अशी शक्‍यता होती. मात्र कृष्णा नदीतील पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे पंचगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह संथगतीने पुढे जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी अत्यंत संथगतीने कमी होत आहे. गेल्या तीन दिवसांत केवळ तीन फुट पाण्याची पातळी कमी झाली आहे. 

दानोळी-समडोळी बंधारा खुला 

दानोळी - वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असून, दानोळी-समडोळीदरम्यानचा बंधारा खुला झाला आहे. चार दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने व चांदोली धरणातून सहा हजार 500 क्‍युसेकने असलेला विसर्ग काल (ता. 10) दोन हजार 500 क्‍युसेक कमी केल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. आज सायंकाळी हवामान खात्याचा अहवाल आल्यावर पुन्हा सहा हजार क्‍युसेकने विसर्ग केला आहे. 

तुळशी परिसरात 24 मिमी. पाऊस 

धामोड - येथील तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. येथे धरण क्षेत्रात 24 तासांत 24 मि.मी पाऊस झाला. आज जलाशयात 83 टक्के साठा झाला. धरणाची पातळी 613.58 मीटर असून एकूण साठा 2878दलघफू आहे. धरण क्षेत्रात आजअखेर 1980 मिमी. पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात केळोशी बुद्रुक येथील लोंढा नालाच्या उजव्या सांडव्यातून व इतरत्र 700 क्‍यूसेकचा विसर्ग येत आहे. 

चिकोत्रात 69 टक्के साठा 

पिंपळगाव किल्ले भुदरगड परिसरात आज पावसाने उघडीप दिली. चिकोत्रा धरणात 69.24 टक्के साठा झाला आहे. मागील चोवीस तासात चिकोत्रा धरणक्षेत्रात 12 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. 

संपादन - मतीन शेख

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com