कोल्हापूरमध्ये लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू जयंती अशी होणार साजरी ; यांना मिऴणार शाहू जीवनगौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 22 June 2020

"सामाजिक क्रांतीचे जनक, बहुजनांचा आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी थाटामाटात साजरी होते. यंदा मात्र.....

कोल्हापूर : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी साध्या पद्धतीने राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात येणार असून, निसर्गमित्रचे कार्यवाहक अनिल चौगुले व शाहू क्रीडा कबड्डी मंडळाचे संस्थापक मानसिंग पाटील यांना शाहू जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक पैलवान बाबा राजेमहाडिक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. बिंदू चौकात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल.

हेही वाचा- फादर्स डे दिवशीच त्याच्यावर आली वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

वाचा सविस्तर...

श्री. राजेमहाडिक म्हणाले, "सामाजिक क्रांतीचे जनक, बहुजनांचा आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी थाटामाटात साजरी होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती साध्या पद्धतीने साजरी करत आहोत. या वेळी चीनच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहणार आहोत. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणार आहोत. जैताळ ग्रामपंचायतीच्या वतीने जैताळ येथे शंभर विविध रोपट्यांची रोपण करणार आहोत. दोन्ही कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून व कायद्याचे पालन करून केले जाणार आहेत." पत्रकार परिषदेस हिंदुराव हुजरे-पाटील, मदन पाटील, उज्वल नागेशकर, दिलीप सावंत उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajarshi shahu jayanti news in kolhapur and press conference kolhapur