sakal

बोलून बातमी शोधा

raju shetty s son Saurabh Shetty responsibility poor sister doctor

प्रज्ञाने केंद्रात पहिला क्रमांक मिळविला. परंतु, आता पुढील शिक्षणाचे काय? हा प्रश्न प्रज्ञासमोर उभा ठाकला होता.

अन् राजू शेट्टींचा मुलगा धावला बहिणीच्या मदतीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिक्षणाची उमेद मनात असेत तर कितीही मोठी संकटे आली तरी त्यावर मात करता येते. शिवाय प्रयत्न प्रमाणिक असले की कोणीतरी मदतीला धावते आणि समोरील मोठी-मोठी संकटे बाजुला होतात. याचा प्रत्येत कोल्हापुरातील एका विद्यार्थिनीला आला आहे. 


पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थ्यीनीने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. प्रज्ञाच्या या यशाचे सर्वत्र कोैतुक  होत आहे. परंतु, याचवेळी घरच्या परिस्थिमुळे पुढील शिक्षणाचे काय प्रश्न तिच्यासमोर होता. परंतु, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी प्रज्ञाच्या मदतीला धावून आला आणि तिच्यासमोरील हा प्रश्न सुटला. 

घरच्या खडतर परिस्थितीसोबतच प्रज्ञाने दहावीचा अभ्यास केला. आईनेही रोजगार करून आपल्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. दहाविचे वर्ष संपले परीक्षा झाली आणि गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत प्रज्ञाने केंद्रात पहिला क्रमांक मिळविला. परंतु, आता पुढील शिक्षणाचे काय? हा प्रश्न प्रज्ञासमोर उभा ठाकला होता. आईच्या तुटपुंज्या रोजगारावर चार भावंडासोबत प्रज्ञाच्या शिक्षणाचा चर्च पेलणे शक्य नाही. ही गोष्ट सौरभला समजली. त्यावेळी प्रज्ञाची शिकण्याची जिद्द आणि तळमळ पाहून तात्काळ तिच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेतर्फे करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. 
 

हे पण वाचाभर समुद्रात त्यांनी काढले सहा महिने 


स्वाभिनानी शेतकरी संघटनेची विद्यार्थी आघाडी म्हणून स्वाभिमानी विद्यार्थी परिषद कार्यरत आहे. ही परिषद सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. याच परिषदेच्या माध्यमातून सोैरभ शेट्टी याने प्रज्ञाची भेट घेतली. यावेळी तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने सौरभला राखी बांधली. त्याचवेळी येथून पुढच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मोठ्या भावाप्रणाने उचण्याचा शब्द सौरभने तिला दिला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top