''कृषी विधेयकाला शेतकर्‍यांचा विरोध नाही, काँग्रेस त्‍याचे राजकारण करत आहे'' 

ramdas athawale criticism on congress
ramdas athawale criticism on congress

कोल्‍हापूर - नवीन कृषी विधेयकाला शेतकर्‍यांचा विरोध नाही. काँग्रेस त्‍याचे राजकारण करत आहे. राज्‍यसभेमध्‍ये काँग्रेसने अक्षरश: दादागिरी करत अवमान करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यामुळे आजच्‍या बंदमध्‍ये आपणास शेतकरी कुठे फारसा पहावयास मिळाला नाही. केवळ राजकीय हेतुने हा बंध पुकारला असल्‍याने तो फसला आहे. अशी टीका केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

रामदास आठवले म्हणाले, केंद्र शासनाने मंजूर केलेल्‍या नवीन कृषी विधेयकाचा उल्‍लेख काँग्रसने आपल्‍या जाहिरनाम्‍यात केला होता. शेतकर्‍यांचे उत्‍पन्न वाढले पाहिजे त्‍यासाठी त्‍यांना शेतीसोबत अन्‍य उद्योग करावेत, असे शरद पवार मुख्‍यमंत्री असताना म्‍हणत होते. त्‍यामुळे केवळ राजकारणासाठी या विधेयकाला विरोध करण्‍यात येत आहे. 

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे. असे सांगून आठवले पुढे म्हणाले, त्‍यांच्‍या मागणीनुसार स्‍वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आरक्षण जातीवर अवलंबून असल्‍यामुळे आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोधच राहिल. असे स्‍पष्‍ट करून केंद्रिय सामाजिक न्‍यायमंत्री रामदास आठवले यांनी २०२१ मध्‍ये करण्‍यात येणारी जनगणना जातनिहाय करावी. अशी आपण मागणी करणार असल्‍याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.


मंत्री आठवले पुढे म्‍हणाले, मराठा समाजातील सर्वच लोक श्रीमंत नाहीत. ९० टक्‍के लोक गरीब आहेत. त्‍यामुळे मराठा समाजासाठी आरक्षण दिलेच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतू सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍याला स्‍थगिती दिली आहे. क्षत्रीयांनाही आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण हे जातीवर अवलंबून आहे. त्‍यामुळे जातव्‍यवस्‍था अस्‍तित्‍वात असेल तोपर्यंत आरक्षण हे जातीवरच द्यावे. त्‍यासाठी जातनिहाय जनगणना होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे कोणत्‍या जातीचे किती प्रमाण आहे हे लक्षात येईल. भटक्‍या विमुक्‍त जाती, जमातींबद्दलही एक समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. त्‍या समितीचा अहवाल येत्‍या दोन, तीन महिन्‍यात सादर होण्‍याची शक्‍यता आहे. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष उत्तम कांबळे, प. महाराष्‍ट्र अध्‍यक्ष प्रा. शहाजी कांबळे, बी. के. कांबळे, मंगल माळगे आदी उपस्‍थित होते.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे काम चांगले

कोरोना महामारीमध्‍ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्‍ट्रात मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. यासंदर्भात आपणही सर्वात प्रथम गो कोरोना ही घोषणा दिली होती. यावर काही लोक हसले होते. परंतू नंतर हीच स्‍लोगन सर्वत्र देण्‍यात येऊ लागली. असे मंत्री आठवले यांनी सांगितले.
 
 
संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com