एसटीला सावरण्यासाठी हवेत इतके हजार कोटी वाचा

 Read so many thousands of crores in the air to recover ST
Read so many thousands of crores in the air to recover ST

कोल्हापूर ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याची जीवनदायी असलेल्या एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला सलग तीन महिने ब्रेक लागला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा दोन हजार कोटींचा महसूल बुडाला आहे. अशात राज्य शासनाने 270 कोटींचे एसटीचे देणे दिले आहे. यात मागील महिन्याचा पगार व पुढील देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च यावर बहुतांशी रक्कम गेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होणेही मुश्‍कील आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. 
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन पुकारला आहे, तो जवळपास दीड महिने सुरू होता. त्यानंतर काही अंशी लॉकडाउन शिथिल केला. याचवेळी मुंबई पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसगणिक वाढत गेली, तर मुंबई -पुण्यातील अनेक लोक आपापल्या गावी गेले. राज्यातील अन्य जिल्ह्यांतीलही बाधितांची संख्या वाढू लागली. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक अद्याप बंद आहे. त्याला त्यामुळे एसटीची प्रवासी सेवा 102 दिवस बंद राहिल्याने रोजचे 20 ते 23 कोटी रुपयांचे उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले. 
अशा स्थितीत जिल्ह्यात अंर्तगत प्रवासी सेवा सुरू असली तरी गावे बंद असल्याने प्रवासी प्रतिसाद नाही. राज्यभरात फार तर रोज 40 ते 50 लाख रुपयांचा महसूल एसटीला मिळतो, त्यावर रोजचा खर्च भागविणेही मुश्‍कील आहे. ही स्थिती अशीच आणखी काही दिवस जरी अशी राहिली तर पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनालाही पैसे मिळणे मुश्‍कील असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाचे रोज 23 कोटींचे नुकसान होते आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन 50 टक्के देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य हप्त्यांच्या रकमा कपात करण्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जेमतेम 2000 ते 6000 हजार इतकेच वेतन हाती मिळते, अशात घर चालविणे मुश्‍कील होत आहे. याच विचार करता कर्मचारी त्यांची पोरं बाळ जगातील एवढा तरी पगार मिळावा यासाठी राज्य शासनाने एसटीला 2000 कोटींची आर्थिक मदत द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावावी, अशी विनंती आहे.'' 
- संदीप शिंदे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी 

राज्यभरात कर्मचारी -1 लाख 5 हजार 
18 हजार गाड्या 
रोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक 
36 सवलत योजना 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com