रिपब्लिकन आठवले गटाला हव्यात 16 जागा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

भाजपच्या कार्याचा रिपब्लिकन पक्ष व राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी नेहमीच सन्मान केला आहे

कोल्हापूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यंदाची महापालिका निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडे 16 जागांची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भेट घेऊन जागा देण्याची मागणी केली आहे. 

भाजपच्या कार्याचा रिपब्लिकन पक्ष व राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी नेहमीच सन्मान केला आहे. त्यामुळे रिपब्लिकनचे कार्यकर्ते भाजपच्या राजकीय वाटचालीत नेहमीच सक्रिय सहभागी असतात. महापालिका क्षेत्रात आरक्षित मागासवर्गीय प्रभागांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे. अशा एकूण 16 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणता येणार आहेत. त्यामुळे पार्टीला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात अशा मागणीचे निवेदन श्री. पाटील यांना दिले. 

हे पण वाचाभन्नाटच : मतदान केले तरच मिळणार चिकन-मटन

 

मागितलेल्या जागा अशा 
राजेंद्रनगर, सिद्धार्थनगर, सदर बझार, शाहू कॉलेज, सुर्वेनगर, आपटेनगर, सर्किट हाऊस, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, मुक्त सैनिक वसाहत, शाहू मार्केट यार्ड, विक्रमनगर, खोल खंडोबा, बुद्ध गार्डन, रामानंद नगर आदी. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republican party wants 16 seats in kolhapur municipal corporation election