राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशीत  गतवर्षीपेक्षा सहा टीएमसींवर साठा 

 Reserves at six TMC than last year in Kalammawadi, Tulshi including Radhanagari
Reserves at six TMC than last year in Kalammawadi, Tulshi including Radhanagari

कोल्हापूर : राधानगरीसह काळम्मावाडी व तुळशी धरणात आजघडीला गतवर्षीपेक्षा सहा टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. या तीन धरणांत आजच्या दिवशी 17 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो 10.82 टीएमसी होता. पाऊस सुरू होण्यास सव्वा महिना बाकी असतानाच तिन्ही धरणांतील पुरेशा पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाईची शक्‍यता नाही. 

उलट पावसाळा सुरू होताना या धरणात शिलकी पाणीसाठा राहणार आहे. त्यामुळे धरणे यंदा लवकर भरून अतिवृष्टी काळात पूरस्थितीची शक्‍यता अधिक वाढली आहे. जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणी वापराचे काटेकोर नियोजन आखले आहे. 

गेल्या पावसाळ्यात ही धरणे संचय क्षमतेइतकी भरली. त्यातच पावसाळा महिनाभर अधिक काळ सुरू राहिल्याने धरणातील पाणी वापरावरील ताण कमी राहिला. त्यामुळेच यंदा गतवर्षीपेक्षा सरासरी 25 टक्‍क्‍यांहून जादा पाणीसाठा आहे. राधानगरी धरणात सध्या 46.12 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीपेक्षा तो 33.72 टक्के होता. काळम्मावाडीत 45.94 टक्के, तर तुळशीत 62.10 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी अनुक्रमे 24.62 टक्के आणि 47.46 टक्के होता. काही दिवसांपासून पडणाऱ्या वळीव पावसामुळेही सध्या सिंचनासाठीचा पाणी वापर कमी झाला आहे. भोगावती, दुधगंगा व तुळशी नद्या भरून वाहत असल्याने पाणी प्रदूषणही लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. कोरोनाचे संकट आले; मात्र पाणीटंचाईचे संकट टळले आहे. 

यंदा आणि गतवर्षीचा धरणनिहाय पाणीसाठा (30 एप्रिलपर्यंत) 

*राधानगरी - 3.85 - 2.82 
काळम्मावाडी- 11.02 - 6.25 
तुळशी - 2.15 - 1.75 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com