सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका?

Restart thumbs up while distributing grain at a cheap grocery store
Restart thumbs up while distributing grain at a cheap grocery store

इचलकरंजी : स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप करताना पुन्हा ग्राहकांचा अंगठा घेण्यास सुरवात केल्याने शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. आधीच शहरात कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढत असून, रोज बाधित रुग्णांचे अर्धशतक पार होते. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी धान्यवाटप करताना ग्राहकांचा अंगठा घेतल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची भीती स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांमध्ये आहे. 

पुरवठा कार्यालयाचे कामकाजही ठप्प आहे. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पुरवठा कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या धान्य दुकानदार व ग्राहकांत भीतीचे वातावरण आहे. शासनाने ऑगस्टपासून ग्राहकांच्या अंगठ्याने धान्य वितरणाची यंत्रणा पूर्ववत सुरू केली. शहरातील 103 धान्य दुकानातून एकूण 89 हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्यवाटप केले जाते. धान्याचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांना कोरोनाची लागण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहू शकेल. 

शहरात जवळपास सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तब्बल 90 कंटेन्मेंट झोन झाले आहेत. बाधित रुग्णांबरोबर मृतांची संख्याही वाढत आहे. स्वस्त धान्य दुकानात असलेल्या बायोमेट्रीक मशिनवर वारंवार अंगठा घेतल्याने ग्राहकांतून कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना तपासणीची सोय उपलब्ध नाही. ग्राहकांचा अंगठा लावून धान्य वाटपानंतर कोरोनाबाधित आढळून आल्यास पुन्हा शहरात संसर्ग वाढू शकतो. स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वितरण प्रणाली सुरू करावी अथवा शासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. 
- गुंडा फेगडे, अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com