esakal | सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी :  गुरुजींची अपार माया अन् त्यांच्याच साडीने सजते माहेरवासीनीची काया
sakal

बोलून बातमी शोधा

Retired teacher in Pohale special story by niwas mote

पोहाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाकडून गावातील .

सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी :  गुरुजींची अपार माया अन् त्यांच्याच साडीने सजते माहेरवासीनीची काया

sakal_logo
By
निवास मोटे

 जोतिबा डोंगर (कोल्हापूर)  : स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत मात्र पोहाळे तर्फ आळते ता . पन्हाळा या गावातील विश्वास श्रीपती काटकर यांनी गावातून वर्षभर लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकी ना माहेरची साडी देऊन पित्रू धर्म निभावला आहे . हे करताना गावातील मुलींचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली की माहेरची माया कमी होते असा गैरसमज आहे . तो समज खोटा ठरवत सासुरवाशीन मुलींना माहेरपणाचा आधार असल्याचा संकेत देणारा उपक्रम श्री काटकर यांनी सुरू केला आहे . हा उपक्रम जिवंत असेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे .


त्यांच्या या उपक्रमाविषयी परिसरात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे . गावची लाडकी सुकन्या विवाह प्रसंगी सर्वांचा निरोप घेऊन आपल्या सासरला जाणार आहे . सहाजिकच अंतकरण भरून येणारा क्षण आहे .पण सर्व काही विसरून आम्ही कन्यादान करतोय . आमच्या गावची शान गावची लाडकी लेक आपल्या पदरात घ्या . अशी विनवनी करतोय . तिला आपलेसे करून माहेरची उणीव भासू नये . तिला सासर हेच माहेर असे वाटण्या करत व त्या मुलीला प्रोत्साहान देण्याकरता माहेरची साडी देण्याचा निर्णय श्री काटकर यांनी घेतला आहे .
 पन्हाळा तालुक्यात मुलींचे प्रमाण कमी आहे मुलींचा जन्मदर वाढावा स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी मुलगीच ही श्रेष्ठ आहे दोन्ही कुटुंबाचा उद्धार करणारी तीच आहे . सासर माहेर ला संभाळून घेणार ही मुलगीच आहे . तिचा आदर सत्कार करण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे .

हेही वाचा- दुसरी लाट आली तर मुकाबल्यासाठी सज्ज -


 एके दिवशी गावातील महिला डॉक्टर  कु . गौरी अशोक साळोखे तिचे वडील अशोक साळोखे श्री विश्वास काटकर हे तिघे एकत्र येऊन स्त्रीभ्रण हत्या या विषयावर चर्चा करत होते . त्यावेळी गौरी साळोखे हिने शालेय जीवनामध्ये कन्या वाचूया  स्त्री भ्रुन हत्या या विषयी पथनाट्य करून मोठी जनजागृती केली होती . या पथनाट्याचे प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यात ठिकाण झाले होते . याची आठवण करून दिली व या बैठकीतच श्री काटकर यांना  गावातील मुलीना माहेरची साडी देण्याची कल्पना सुचली . त्यांनी चालू वर्षातील विवाह मुहूर्तापासून ही साडी भेट देण्यास सुरुवात केली आहे . गावातील कोणत्याही प्रकारचा जातीभेद न मानता ही साडी देण्याचे काम विश्वास काटकर त्यांच्या पत्नी पुष्पा काटकर हे दांपत्ते करीत आहे . लग्न झाले की मुली परत माहेरी आल्यावर  त्यांना घरी बोलावून तिला गोडधोड खायला घालून हे साडी चोळीचे वान हे दांपत्य देत आहे .


श्री काटकर यांनी 35 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली आहे 2010 मध्ये ते सेवानिवृत्त झाले . शाळेत त्यांनी अनेक गरजूंना शैक्षणिक मदत केली आहे शाळेत चांगली सेवा केल्या बददल  व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत .

 समाजात मुलगी  हीच सर्वश्रेष्ठ आहे . ती दोन्ही कुटुंबाचा उद्धार करू शकते . गावातील सावित्रीच्या लेकींचा सन्मान करावा त्यांना अंतःकरणपूर्वक निरोप द्यावा  एक सामाजिक कर्तव्य म्हणून हातभार लागावा या हेतूने मी माहेरची साडी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे . मी जिवंत आहे पर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार आहे .
 
विश्वास काटकर ,पोहाळे तर्फ आळते ता . पन्हाळा

संपादन - अर्चना बनगे

go to top