revolver of honor shubhangi life journey abdullat inspiring marathi news
revolver of honor shubhangi life journey abdullat inspiring marathi news

Inspiring: 11 मानाची पारितोषिके खेचून आणत शेतकऱ्याच्या मुलीने साकारले मोठे स्वप्न! रिव्हॉल्वर ऑफ हॉनर शुभांगीचा जीवनप्रवास

इचलकरंजी (कोल्हापूर) :  पीएसआय परीक्षेत राज्यात मुलींमध्ये चौथ्या आलेल्या शिरोळ तालुक्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला पीएसआय प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार मिळाला. शुभांगी शिरगावे (रा. अब्दुललाट ता. शिरोळ) असे तिचे नाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला रिव्हॉल्वर ऑफ हॉनर हा मानाचा हा पुरस्कारही दिला गेला. दीक्षांत संचलन समारंभात शुभांगीला 668 पोलिस उपनिरीक्षकांचे परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा मान मिळाला. 

एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश नक्कीच अनेकांना प्रेरणादायी आहे. 2018 साली पीएसआय परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये अब्दुललाटच्या शुभांगीनेनी राज्यात मुलींमध्ये चौथा क्रमांक पटकावला. अभ्यासाच्या अपार कष्टाने घरच्या परिस्थितीतून जगण्यासाठी खंबीर झालेल्या शुभांगीचे 7 जानेवारी 2020 पासून नाशिक येथील पोलीस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण सुरू झाले. पोलिस या भूमिकेची जबाबदारी पार पाडत असताना कायद्याचे शिक्षण व शारिरिकरित्या सक्षम होण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण तिने जिद्दीने घेण्यास सुरुवात केली.प इनडोवर व आऊटडोअर अशा दोन्ही पातळीवरील प्रशिक्षण कालावधीनंतर परीक्षा घेतल्या जातात. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षामध्ये शुभांगीला 18 पैकी 11 पारितोषिके मिळाली. कोरोना काळात वारंवार खंड पडणाऱ्या प्रशिक्षणात तिने कष्टपूर्वक प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.पीएसआय परीक्षेत चमकलेली शुभांगी पुन्हा मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात लौकिकास पात्र ठरली. 18 पैकी 11 मानाची  पारितोषिके खेचून आणत पोलीस खात्यात सक्षम अधिकारी म्हणून काम करण्यास सिद्ध असल्याचे तिने दाखवून दिले आहे.

शुभांगीचे प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अब्दुललाट येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी इचलकरंजीतील नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.द्वितीय वर्षापर्यंत याच कॉलेजमध्ये कला शाखेचे शिक्षण घेऊन तृतीय वर्षासाठी कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात  प्रवेश घेतला. शिवाजी विद्यापीठातून पदवी घेऊन पीएसआय परीक्षेची तयारी सुरु केली. शेतात जाणाऱ्या वडिलांची शिकवण्याची धडपड,आईच्या कष्टामुळे शुभांगीने झोकून देऊन अभ्यास केला. अपार कष्टाच्या जिद्दीने तिला 2018साली पीएसआय बनवले. हीच जिद्द, चिकाटी, कष्ट पीएसआय प्रशिक्षणात कायम ठेवत सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा बहुमान मिळवला. 470 पुरुष आणि 188 महिला पोलीस उपनिरीक्षकांचे नेतृत्व शुभांगीने केले. शुभांगीचे हे यश अख्ख्या महाराष्ट्राला गवसणी घालणारे ठरले आहे.

जिद्दीपुढे नियतीही झुकली
 
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या शुभांगीला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. स्वप्न, जिद्द, कष्ट या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ध्येयाप्रती प्रयत्न मात्र तिने सोडले नाहीत. या जिद्दीने शुभांगीला पीएसआय आणि महाराष्ट्रातील 668 पोलिस उपनिरीक्षकांनामध्ये सर्वोत्कृष्टही बनवले.

शिक्षणाच्या योग्य सुविधा नसताना देखी शुभांगीची अभ्यासासाठी तळमळ असायची. नाईट कॉलेजला प्रवेश घेऊन दिवसभर घरी अभ्यास करायची.तिने मिळवलेले यश आमच्या कष्टाला बळ देणारे ठरले आहे.
 चंद्रकांत शिरगावे, शुभांगीचे वडील


कष्ट केल्यावर यश आपलेच असते.ध्येयासाठी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे धडपडल्यास जीवनात खूप काही करता येत.पीएसआय परीक्षेत मिळालेले यश याचेच उदाहरण आहे.

शुभांगी शिरगावे,पोलीस उपनिरीक्षक

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com