भात, सोयाबीन, भुईमूग पिकांना पावसाचे टॉनिक

Rice, Soybean, Groundnut Crops Benefit From Rain Kolhapur Marathi News
Rice, Soybean, Groundnut Crops Benefit From Rain Kolhapur Marathi News

 गडहिंग्लज : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर आणि तालुक्‍यात दमदार पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांना एकप्रकारचे टॉनिक मिळाले आहे. भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. नेसरी भागातील भात, नाचणा रोप लावणीलाही या पावसाने गती मिळाली आहे.

जूनच्या पहिल्या दिवसापासून पाऊस प्रारंभ झाला. चक्रीवादळाच्या या पावसात अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली. तीन दिवसांनंतर पावसाने दडी मारली. पंधरा दिवसांनंतर पुन्हा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. जूनच्या अखेरच्या टप्प्यातही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले. माळरानावरील भात, सोयाबीन पिके अडचणीत येतात की याची भीती वाटू लागली.

गेल्या आठवडाभरापासून अधून-मधून पावसाच्या सरी पडू लागल्याने सोयाबीनला एकप्रकारचे सलाईन मिळाले, परंतु माळरानावरील भात पीक धोक्‍यात होते. दोन दिवसांपासून वरचेवर पाऊस हजेरी लावल्याने भातालाही जीवदान मिळाले. 

आज सकाळपासून अखंडित पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अधून-मधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. यामुळे खरिपातील सर्वच पिकांना या पावसाचे टॉनिक मिळाले. पिकांची उगवण चांगली झाली आहे. पावसाने दडी मारल्याने ही पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता असतानाच पुन्हा निसर्गाने त्याला तारल्याचे चित्र आहे. सोयाबीन व भातावर किडरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आजच्या जोरदार पावसामुळे ही किड धुवून जाण्यासही मदत होणार आहे. 

नदीच्या पाणी पातळीत वाढ 
आजरा व आंबोली परिसरातील पावसामुळे हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. दोन दिवसांत चार फुटांहून अधिक पाण्याची पातळी वाढली आहे. नदीला गढूळ पाणी आले असून नागरिकांनी पाणी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com