अजबच; तब्बल दोन कोटींचा रस्ता एका वर्षातच खचला 

road damage for kolhapur jyotiba
road damage for kolhapur jyotiba

जोतिबा डोंगर - जोतिबा -कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका परिसरात गेल्या वर्षी पावसाळ्यात तयार करण्यात आलेला रस्ता खचला आहे. गेल्या वर्षीच दोन कोटी रूपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, दोन दिवस पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने तो खचला आहे. या रस्त्यावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.  

या रस्त्याच्या कामासाठी सुमारे दोन कोटी खर्च आला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात हा रस्ता अगदी नेटका, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आला होता. या रस्त्याचे भवितव्य  येथील निसर्गावरच अवलंबून होते. कारण येथे उंच डोंगर माथे असून सतत पावसाची रिपरिप, दाट धुके आणि जोरदार वाऱ्याचा सामना या परिसराला सहन करावा लागतो.

गेल्या वर्षी पाण्याचा टाका परिसरातील रस्ता जुलै ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जोरदार अतिवृष्टीमुळे तुटून गेला होता. परिणामी, जोतिबा डोंगराला जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे गायमुख तलाव मार्गावरील नागमोडी  रस्त्याने सुरू झाली होती. पावसाळ्यात वेगवेगळ्या तज्ञांनी या रस्त्याला भेट देऊन अभ्यास केला.

केंद्र शासनाच्या पुरहानी योजनेतून (एफ डी आर ) या रस्त्यासाठी तातडीने दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार तातडीने पाऊस कमी आल्यानंतर या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले. पावसामुळे तुटून गेलेला हा सर्व रस्ता मोठ्या मशिनच्या साह्याने खोदण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दगड तसेच भराव टाकून घेण्यात आला. बाजूने रस्ता घसरू नये म्हणून १५० मीटर लांबी गॅबीन वॉल ( लोखंडी जाळीत दगड )  पाच मीटर रूंद करण्यात आले असून त्यामुळे रस्ता तुटून जाऊ नये यासाठी मोठी मदत होणार होती.   दरम्यान, 
यापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी तीन वेळा दोन- दोन कोटी असे ६ कोटी रुपये शासकीय विविध योजनेतून मंजूर झाले होते. या योजनेतून हा रस्ता झाला पण तो पावसाळ्यात तुटला.  

 जोतिबावरील पाण्याचा टाका हा रस्ता दलदलीचा आहे. तरीही हा रस्ता काळजीपूर्वक  दर्जेदार आणि टिकाऊ केला होता. पण पुढे त्याचे भवितव्य तेथील निसर्गाच्या हातात होते. गेल्या वर्षी प्रमाणे आज पावसामुळे हा रस्ता खचला. 

-शिवाजी काशीद, रस्ता ठेकेदार 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com