इचलकरंजीतील संसर्गाचा ग्रामीण भागाने घेतलाय धसका

rural area alert for ichalkaranji corona infection
rural area alert for ichalkaranji corona infection

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता परिसरातील तब्बल 14 गावांनी त्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजाराबाबत धसका घेतला आहे. यातील अनेक ग्रामपंचायतींनी आठवडा बाजार भरवण्याची पध्दत बंद केली असून काही ग्रामपंचायतींनी केवळ आपल्या गावातीलच विक्रेत्यांना बाजारात बसण्याची परवानगी दिली आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागास दैनंदिन व्यवहार करण्यासाठी इचलकरंजी शहराचा मोठा आधार असतो. खरेदी विक्री, औषधोपचार, शिक्षण, आरोग्य अशा अनेक बाबींबाबत ग्रामीण भागातील नागरिक दररोज शहराशी संपर्कात आहेत. याशिवाय यंत्रमाग उद्योगाचे जाळे नजीकच्या गावामध्येही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. परिसरातील 8 ते 10 गावातील नागरिक व कामगार शहरात दररोज ये-जा करत असतात. शहरात यंत्रमाग कामगारांच्यापासून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने याचा धसका आता ग्रामीण भागातील प्रशासनाने घेतला आहे.
बहुतांश गावात आठवडा बाजार गेली काही वर्षे नियमीतपणे सुरू झाला आहे. या दिवशी बाहेरील सुमारे 40 ते 50 विक्रेते टेम्पो घेऊन विक्रीसाठी येतात. हे विक्रेते शहराबरोबरच अनेक गावामध्ये फिरत असतात. त्यामुळे अशा विक्रेत्यांपासून संपर्क अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक ग्रामपंचायतीने आठवडा बाजार भरविण्याची पध्दत पुढील परिस्थिती आटोक्‍यात येईपर्यंत थांबवली आहे. तर काही गावांनी केवळ गावातील विक्रेत्यांनाच आठवडा बाजारमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरील विक्रेत्यांच्याकडून भाजीपालाबरोबरच अनेक दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, कपडे यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. अशा विक्रेत्यांच्याकडून गावा गावात होणारी उलाढाल आता ठप्प होणार आहे.

गावेही सावधान
शहरातील कामगार मोठ्या प्रमाणात गावामध्ये राहतात. त्याचबरोबर यंत्रमाग उद्योगाच्या जाळ्याच्या माध्यमातून दैनंदिन मोठी उलाढाल सुरू असते. इचलकरंजीतील कनेक्‍शनच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील काही गावातील यंत्रमाग कामगारांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर गावातील प्रशासन व नागरिक आता सतर्क झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com