घोषणा करणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान की कृषिमंत्री

Rural Development Minister Hasan Mushrif criticism on BJP state president Chandrakant Patil
Rural Development Minister Hasan Mushrif criticism on BJP state president Chandrakant Patil

कोल्हापूर: केंद्र सरकार शेती कायद्यात कदापिही बदल करणार नाही, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री, असा सवाल करत श्री. पाटील यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असा सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. हिंमत असेल तर भाजपने बांधावर जाऊन हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे पटवून द्यावे, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लावला. तसेच मंगळवारी (ता. ८) शेतकरीविरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत कडकडीत बंद पाळावा, असे आवाहनही दोन्ही मंत्र्यांनी केले.


मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘केंद्राने शेतकरीविरोधी कायदा केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत ऐन कडाक्‍याच्या थंडीत शेतकऱ्यांना देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी चर्चेची तयारी दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा व कृषिमंत्री तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत, मात्र हे शेतकरी सरकारचा चहादेखील प्यायला तयार नाहीत. शेतीचे कंत्राटीकरण करून शेतजमिनी कवडीमोल भावाने अदानी, अंबानीच्या घशात घालण्यासाठी कायदे केले आहेत.’’


पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी शेतकरी कायदे रद्द केले जाणीर नाहीत, अशी भूमिका मांडली आहे. यातून भाजप किती शेतकरीविरोधी आहे, हेच स्पष्ट झाले आहे. बड्या उद्योगपतींच्या हितासाठी कायदे केले आहेत. अंबांनींच्या रिलायन्ससाठी बीएसएनएल कंपनी देशोधडीला लावली आहे. याच पद्धतीने शेतकऱ्यांची अवस्था होणार आहे. इचलकरंजीत सूत व्यापारी जशी कारखानदारांची फसवणूक करतात तसाच प्रकार शेतीत होणार आहे.’’

शेतकऱ्यांना समर्थनासाठी सर्वांनी शेती, बांध व घरावार काळा झेंडा लावा. मोबाईल डीपीवर निषेधासाठी काळा स्टेटस ठेवा. केंद्र सरकार हे विरोधाला नाही; पण सोशल मीडियाला घाबरते. त्यामुळे सोशल मीडियातून शेतकरी आंदोलनाचे समर्थन भाजपच्या धोरणांना विरोध करा. अत्यावश्‍यक सेवा वगळून एक दिवस व्यापारी, शेतकरी, एसटी. वाहूतक व्यवस्था यांनी बंद पाळा आणि शेतकऱ्यांचे समर्थन करा. हे करत असताना कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घ्या. 
- सतेज पाटील, पालकमंत्री

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com