'दबंग भाईजान' आलाय कोल्हापुरच्या या मदतीला...

salman khan come for help in kolhapur villages affected from flood
salman khan come for help in kolhapur villages affected from flood

कोल्हापूर - बॉलिवूडचा 'दबंग भाईजान' अभिनेता सलमान खान कोल्हापुरातील पुराचा फटका बसलेल्या गावाच्या मदतीला आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. पंचगंगा,कृष्णा नदीला आलेला महापूरा मुळे नदीकाठची बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आलते. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक दानशुर लाकांनी, सामाजिक संस्थानी जणांनी हात पुढे केला होता. आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडलेली घरं पुन्हा बांधून देण्यासाठी या ‘भाईजान’ने उशिरा का असेना, धाव घेतली आहे.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी सलमान पक्की घरं बांधून देणार आहे. अद्याप सलमान खानकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

शासनासोबत एलान फाऊंडेशनचा करार 

ठाकरे सरकार आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने ही कामं केली जाणार आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनासोबत एलान फाऊंडेशनने या योजनेसाठी करार केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सात सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे.

‘भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा लहानसा प्रयत्न आहे. सहकार्याबद्दल सलमान खानचे आभार’ अशी प्रतिक्रिया ‘एलान फाऊंडेशन’च्या संचालकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com