तो व्हिडीओ पाहून माझे मन हेलावून गेलं : संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कोल्हापूर - प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.यासंदर्भात ट्विट करत खासदार संभाजीराजे यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्या शिवाय राहणार नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी इशारा दिला आहे.

मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात?, असा सवालही संभाजीराजेंनी केला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला आहे. यावरुन भाजपने राज्यातील शिवसेना-काँग्रेसवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Maharaj was outraged because of the removal of Shivaji Maharaj's statue by JCB