नाद कुस्तीचा: ना मैदान फुलले, ना मल्ल लढले ; परंतु बक्षिसांचे वाटप झाले 

sangli district visapur village wrestling ground
sangli district visapur village wrestling ground

विसापूर (जि. सांगली) : कुस्तीसाठी आखाडा सज्ज होता. मल्ल लढायला तयार होते. मैदानाचे पूजनही झाले. जोरदारपणे निवेदन सुरू होते. प्रत्यक्षात कुस्त्या झाल्या नाहीत. अशा रितीने न झालेल्या मैदानात पैलवानांना बक्षिसे मात्र थेट देण्यात आली. कोरोनामुळे तासगाव तालुक्‍यातील पाडळी येथे हे कुस्ती मैदान झाले. मात्र कुस्तीची प्रचंड आवड असल्याने गावकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मैदान भरवले.

कुस्ती आखाड्यासाठी तासगाव तालुक्‍यातील पाडळी प्रसिद्ध आहे. राज्यातील उत्तम आणि गाजलेले पैलवान आखाड्यात हजेरी लावतात. अशा मल्लांसाठी गावकरी तन-मन-धनाने प्रयत्न करतात. त्यामुळे या मैदानाला जुने-जाणते पैलवान हजेरी लावतात. शिवाय चांगल्या पैलवानचे कुस्ती मैदान म्हणून पंचक्रोशीत गावाचा वेगळा लौकिक आहे.

दोन दिवसांपूर्वी सिद्धेश्वराची यात्रा झाली. यात्रेसाठी प्रशासनाने कुस्ती मैदानांसह इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. यात्रा समितीचे अध्यक्ष बाजीराव सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा समितीसह गावकरी व तरुणांची बैठक झाली. 

सोशल डिस्टन्सिंग ठेऊन मंदिर दर्शनाचा निर्णय झाला. हा नियम सर्व गावकऱ्यांनी  पाळला. मात्र गावकऱ्यांच्या नजरा कुस्ती मैदानाकडे होत्या. सगळ्यात प्रिय असणारे मैदान यंदा होणार नाही. त्यामुळे देशभरातून जमा झालेले गलाई बांधव नाराज झाले.
अखेर कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय झाला. मात्र मैदानात गावातल्या मल्लांची जोड लावली. मैदानाचे पूजन करण्यात आले. ईश्वर पाटील निवेदन करीत होते. ते कुस्ती शौकिनांचे अत्यंत आवडते निवेदक. त्यांना मोबाईल वरून लाईव्ह निवेदन करायला सांगण्यात आले. त्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. जोड लावलेल्या मल्लांना यात्रा समितीने थेट बक्षीस दिले.

‘सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलं’ म्हणत मैदानाची सांगता झाली.

कोरोनाविषयी प्रशासनाचे सांगितलेले नियम पाळून यात्रा समिती व गावकऱ्यांनी मैदान भरवले. ना पैलवान होते, ना शौकीन. केवळ कुस्तीचा आखाडा रद्द होऊ नये म्हणून गावकरी व यात्रा समितीने आगळेवेगळे कुस्ती मैदान आयोजित केले. परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com