सांगरूळमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 In Sangrul, Corona killed a young man
In Sangrul, Corona killed a young man

सांगरूळ ः येथील एका तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप दिनकर सासने (वय 32) असे त्याचे नाव आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या प्रदीपच्या घरची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यातच वडील आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे तो नेहमीच तणावात असायचा. लॉकडाऊनमुळे वेल्डिंगचा व्यवसाय बंद आहे. अशा स्थितीत त्याने आज पहाटे घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीपने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसपाटील बाजीराव खाडे यांनी घटनेची माहिती दिली. सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातवाइकांकडे दिला.

संपादन - रंगराव हिर्डेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com