World Statistics Day : SAS सॉफ्टवेअरमुळे आकडेवारीतील हस्तक्षेप थांबला ; धोरण निर्मितीत होतेय मदत

SAS software stopped statistical interference
SAS software stopped statistical interference

कोल्हापूर - माहितीच्या स्वरूपात आकडेवारी जमवणे, त्याचे विश्‍लेषण करत निष्कर्ष काढणे सारांश स्वरूपात मांडण्याच्या शास्त्राला संख्याशास्त्र म्हटले जाते. संख्याशास्त्राला सध्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने माहितीच्या विवरणात अचूकता आणि गती आली आहे. स्टॅटस्टिकल ऍनालिसिस सिस्टिम (एसएएस)च्या माध्यमातून माहितीच्या पृथक्करणाचा उपयोग धोरण निश्‍चितीसाठी होत आहे. या तंत्रज्ञानामुळे आकडेवारीतील फेरफारीसारख्या मानवी हस्तक्षेपाला चाप बसणार आहे. 

अर्थशास्त्र, बायो, व्यावसायिक, जन, डाटा मायनिंग, सामाजिक तसेच ऊर्जा सांख्यिकी असे विविध सांख्यिकीय विभाग आहेत. शासन स्तरावर स्वतंत्र सांख्यिकीय विभाग काम करत असतो. या विभागामार्फत सांख्यिकीय माहिती गोळा करत ती सादर करण्यासाठी नवीन अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. 

स्टॅटस्टिकल ऍनालिसिस सिस्टिम (एसएएस) या आत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे राज्यातील सांख्यिकीय माहितीचे अचुक विश्‍लेषण सध्या केले जात आहे. देशाचे स्थूल उत्पादन (जीडीपी), उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दारिद्र रेषा, रोजगार, पर्यावरणाच्या आकडेवारीवरून दृष्काळ, पाऊसमान यासह इतर महत्त्वांच्या घटकांच्या आकडेवारी या सॉफ्टवेअरच्या आधारे होत आहे. राज्य सांख्यिकी संचलनालयात सध्या या प्रणालीचा वापर होत आहे, लवकरत जिल्हा पातळीवर ही प्रणाली विस्तारली जाणार आहे. 

आकड्यांचे रुपांतर आलेखात... 
उपलब्ध आकडेवारी स्वरुपातील माहिती या सॉफ्टवेअर मध्ये सामाविष्ट केल्या नंतर विविध प्रकारच्या आलेखा मध्ये ही आकडेवारी रुपांतरीत होते.ग्राफिक्स बनवुन माहितीचे विवरण सादर केल्याने ती अधिक प्रभावी व अचूक ठरत आहे.सुरवातीला संगणकातील एक्सेल,वर्ड फाईल मध्ये आकडेवारी भरली जात होती, यात अधिक वेळ जात होता. परंतु एसएएस सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने सध्या आकडेवारी अधिक अचूक व कमी वेळात प्रभाविपणे विश्लेषित होऊन मिळत आहे.
शैक्षणिक संशोधनात उपयोग...

पायथॉन, आर, वेका, रुट यांसारखे सॉफ्टवेअर विद्यापीठातील संशोधन विभागामध्ये उपयोगी येत आहेत. या स्टॅस्टिकल ऍनालिसिस सॉफ्टवेअरच्या आधारे निवडणुकांमधील मतांची टक्केवारी, अर्थशास्त्रातील आकडेवारीचा अभ्यास, समाजशास्त्रातील घटक, भूगोलातील भौगोलिक आकडेवारीचा अचूक अभ्यास करत संशोधन करणे सोप्पे झाले आहे. 

मानवी हस्तक्षेपाला चाप...

शासकीय पातळीवर अधिकारी वर्ग आकडेवारीमध्ये फेरफार करत हवे तसे निष्कर्ष मिळवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु या नवीन सॉफ्टवेअरमुळे या गोष्टीला चाप लागणार आहे. मानवी हस्तक्षेप थांबत, अचूक आकडेवारीमुळे शासनाला धोरण निर्मिती करताना मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com