कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे शालेय पोषण आहार होम टू होम... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व शासकीय व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली. यामुळे शाळेतील पोषण आहाराचे साहित्य तसेच शिल्लक राहिले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिका दाखल केली होती.

 

देवराष्ट्रे (सांगली) - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ, डाळी, तेल, याचे वाटप विद्यार्थ्यांना होम टु होम करीत आहे व कडेगाव तालुक्यात 1 ते 8 वी पर्यंत 12351 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व शासकीय व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली. यामुळे शाळेतील पोषण आहाराचे साहित्य तसेच शिल्लक राहिले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिका दाखल केली होती. त्या अनुशंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश व सरकारच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे. यामुळे शाळास्तरावर तांदूळ, डाळी, तेल वाटप सुरु आहे.

 तालुक्यात वाटपा दरम्यान सोशल डिस्टंन्स ठेवण्यात येत आहे. तसेच स्वच्छतेबाबत  विद्यार्थ्याना सूचना देण्यात येत आहेत.वाटपावेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.पोषण आहाराचे वाटप विद्यार्थ्यांना होम टु होम केले जात आहे.

                   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Nutrition Diet Home to Home because of corona effect