जयसिंगपूरला शाळांमध्ये शुकशुकाट

Schools In Jaysingpur Are Quiet Kolhapur Marathi News
Schools In Jaysingpur Are Quiet Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : नववीपासूनचे वर्ग आजपासून (ता.23) सुरु करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शाळांनी पालकांकडून संमतीपत्रे घेण्याबरोबर शाळांचे वर्ग निर्जंतुकीकरण केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने शिक्षकांचे स्वॅब टेस्ट अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शाळा सुरु करण्यास मुदतवाढ दिल्याने पहिल्याच दिवशी शाळांमध्ये शुकशुकाट राहिला. 

शहरातील विविध शाळांमध्ये बाहेरुन आलेल्यांना क्वारंटाईन केले होते. नगरपालिका प्रशासनाने या शाळांमध्ये क्वारंटाईन लोकांसाठी सोयी-सुविधा दिल्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या. माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेतही बैठका घेऊन नियमावली घालून दिली. 23 तारखेपर्यंत पालकांकडून संमतीपत्रे घेण्याबरोबर शिक्षकांचे स्वॅब टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. 

शिरोळ तालुक्‍यातील सर्वच गावातील शाळांतील शिक्षकांसाठी मौजे आगर येथे एकाच ठिकाणी स्वॅब तपासणी केंद्र सुरु केल्याने येथे तालुक्‍यातील शिक्षकांची गर्दी झाली. शिवाय दिवसाला अडीचशे स्वॅब टेस्ट केले जात असल्याने अनेक शिक्षकांना माघारी जावे लागत होते. सकाळच्या सत्रात नोंदणी आणि दुपारी स्वॅब घेतले जात असल्याने शिक्षकांनी अख्खा दिवस स्वॅब तपासणी केंद्रात घालवावा लागला. शाळा सॅनिटायझर करण्याबरोबर शिक्षकांनी स्वॅब तपासणी करुन सोमवारपासून शाळा सुरु करण्याची तयारी केली. मात्र, जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ झाल्याने पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजू शकली नाही. 

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन केंद्र केले. त्या शाळा नगरपालिका प्रशासनामार्फत निर्जंतुकीकरण करुन दिल्या आहेत. सोमवारपासून शाळा सुरु करण्यासाठी शाळांना आपल्या पातळीवर वेळापत्रक तयार केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांनी संमतीपत्र देण्याला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील जवळपास 30 ते 32 टक्के पालकांनीच संमतीपत्रे दिल्याने पहिल्याच दिवशी शाळांमध्ये फारशी गर्दी होईल, असे चित्र नव्हते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com