यंत्रमाग कामगारांच्या बोनसला कात्री

 Scissors to the spinning workers bonus
Scissors to the spinning workers bonus

इचलकरंजी ः दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा बोनस हा यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. बोनसचे वाटप झाल्यानंतरच वस्त्रनगरीत दिवाळी खरेदीला उधाण येत असते; मात्र कोरोनामुळे यंदाच्या बोनसला कात्री लागण्याची चिन्हे आहेत. 
सरासरी दरवर्षी शहरातील यंत्रमाग व ऍटोलूम कामगारांच्या हातात सुमारे 18 ते 20 कोटी मिळतात. यंदा मात्र केवळ 10 कोटीच्या आसपासच रक्कम बोनसच्या माध्यमातून बाजारात येणार असल्याची माहिती या उद्योगातील जाणकारांनी दिली. 
यंत्रमाग कामगारांना कापड उत्पादनावर मजुरी दिली जाते. ऍटोलूम कामगारांना निश्‍चित वेतन दिले जाते. दरवर्षी दिवाळीला या कामगारांना बोनस देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बोनसवरून सातत्यांने संघर्ष वस्त्रनगरीने अनुभवला आहे; पण यावर कायमचा तोडगा म्हणून 16.66 टक्के बोनस देण्याचा निर्णय यापूर्वीच एका करारांने झाला आहे. 
दिवाळी तोंडावर आल्याने कामगारांचे लक्ष बोनसकडे लागले आहे; पण यंदा कोरोना संकटामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे सुमारे तीन महिने संपूर्ण यंत्रमाग उद्योग ठप्प होता. त्याचा परिणाम कामगारांच्या मजुरीवर झाला आहे. मजुरी कमी पडल्यामुळे त्याचा परिणाम बोनसवर झाला आहे. यंदा बोनसच्या रकमेत सरासरी 40 टक्के कपात होण्याचे संकेत आहेत. 
मुळात यंत्रमाग उद्योग अडचणीत आहे; पण कामगार आणी कारखानदार यांचे इचलकरंजीत नेहमीच सौहार्दांचे संबंध राहिले आहेत. बहुतांशी कारखानदार हे कामगार हा आपल्याच कुटुंबातील एक सदस्य समजतात. त्यामुळे अडचणींचा डोंगर असला तरी कामगारांची दिवाळी साजरी करण्यासाठी बोनसची व्यवस्था कारखानदारांकडून केली जाते. यंदा पुढील दोन - तीन दिवसांत कामगारांच्या हातात बोनसची रक्कम पडणार असल्याचे सांगण्यात आले. 


ऍटोलूम कामगार 
शहरात सुमारे 25 हजार ऍटोलूम कामगार आहेत. त्यांना दरवर्षी 8.33 टक्के बोनस दिला जातो. सरासरी 20 हजार रुपये इतका यंदा बोनस अपेक्षित आहे. 

यंत्रमाग कामगार 
शहरात सुमारे 50 हजार यंत्रमाग कामगार आहेत. प्रथेप्रमाणे 16.66 टक्के बोनस दिला जातो. त्यांच्या हातात यंदा सरासरी 10 हजार रुपये इतका बोनस पडू शकतो.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com