सातवीण बहुगुणी, औषधी वृक्ष ; शिवकाळापासून सरंक्षण आणि सवंर्धन 

सातवीण बहुगुणी, औषधी वृक्ष ; शिवकाळापासून सरंक्षण आणि सवंर्धन 

कोल्हापूर : सातवीण वृक्षाच्या फुलांतून परागकण तयार होतात. या परागकणांमुळे काही जणांनाच ऍलर्जी होते. यामुळे हा वृक्षच समुळ नष्ट करावा, अशी मोहिम काही ठिकाणी सुरु आहे. कारण नसताना ही झाडेही तोडली आहेत. काहीजण हा विदेशी वृक्ष म्हणून नाके मुरडत आहेत; मात्र सातवीण वृक्ष हा देशी असून यकृत, संधीवात, पोटाचे विकार आदीवर तो बहुगुणी आहे. 
जंगलांत, शेतात, रस्त्याशेजारी लावला तर पर्यावरणाबरोबर मनुष्यालाही तो उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे, छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रातही सातवीण वृक्षाचा उल्लेख हा "सातवनादी' असा आहे. गड-किल्ल्यांच्या भोवती सातवीणचे वृक्ष दिसतात. दाजीपूर, राधानगरी, शहरातील सिद्धाळा गार्डन, शिवाजी विद्यापीठ, रुईकर कॉलनीतील रस्त्यांशेजारी हे वृक्ष आहेत. 
सातवीणला जानेवारी ते मेमध्ये फुलोरा आला की, फुलांचा उग्र वास येतो. हा उग्र वास अनेकांना सहन होत नाही. परागणांमुळे काही जणांनाच ऍलर्जीही होते. फक्त ठराविक लोकांना त्रास होतो म्हणून सातवीण वृक्षाचीकत्तल केली जाते. 
जीर्ण अतिसार, आमांश, पोटदुखी, कुष्ठरोग, यकृत विकार, भूक वाढविणे, व्रण, दंतक्षयासाठी याची साल उपयुक्त आहे. सालीत डिटॅमाईन, इकायटामाईन ही अल्कलॉईडस्‌ असतात. 
वृक्षाचे लाकूड खोकी, पेन्सिल आगकाड्या करण्यासाठी वापरले जाते. निसर्गमित्र संस्थेने या वृक्षांच्या बियांचे जतन करुन अनेकांना रोपे दिली आहेत. शिवरायांच्या आज्ञापत्रातील वृक्षांबद्दलची माहिती मराठीत देऊन ही भित्तीपत्रके शाळांत वाटप केले. आज्ञापत्रात सातवीणचा "सातवनादी' असा उल्लेख आहे; मात्र मोडी लिपी तज्ज्ञांनी "सातवनादी'चा "सागवान' असा चुकीचा उल्लेख केल्याने सातवीणला काहीजण अजूनही "सागवान' असेच समजतात. मुळात सागवान हा परदेशी वृक्ष आहे. 

""पुणे, कोल्हापूर, कोकण विभागातील वनांत सातवीण वृक्ष दिसतो. हा वृक्ष दाट लोकवस्तीत लावू नये, असा नियम आहे. आयुर्वेदात उल्लेख असल्याने कोणीही सातवीनाच्या झाडाला इजा करु नये. झाडे बाजूला काढू नयेत. हा वृक्ष जंगलात, रस्त्याशेजारी लावला पाहिजे.'' 
-प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com