मेंढपाळ बनला पोलिस उपनिरीक्षक

Shepherd Became Sub-Inspector Of Police Kolhapur Marathi News
Shepherd Became Sub-Inspector Of Police Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : मनात जिद्द असेल तर परिस्थितीतही अडथळा ठरू शकत नसल्याचे चिपरी (ता. शिरोळ, मूळ गाव, माणगाव, ता. हातकणंगले) येथील मेंढपाळाने दाखवून दिले आहे. बिरू लगमाण्णा जोग या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श घालून दिला आहे. 

बिरू जोग यांना सतीश पोवार, पंकज निर्मळ व भाऊ मंगेश जोग यांचे मार्गदर्शन लाभले. चिपरीतील जि. बा. पाटील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. शाळा, कॉलेजमध्ये दरवर्षी पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. शालेय शिक्षण घेतानाच त्यांनी आपण पोलिस खात्यात सेवा करायची हे ध्येय बाळगले. आई-वडील दोघेही शेतमजुरी करून उदरनिर्वाह केला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. 

बारावीनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या बिरू यांना पोलिस खात्यातील सेवेचे स्वप्न शांत बसू देत नव्हते. यातूनच त्यांनी झपाटून परीक्षेची तयारी केली. आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकारले. वय लक्षात घेता एकच संधी हाती होती. मात्र, प्रयत्नांनी त्यांनी ही पहिली आणि शेवटची संधी साधली. आई आक्काताई, वडील लगमाण्णा, भाऊ मंगेश यांनी त्याला प्रोत्साहन दिले. 

मेंढ्या शेतात फिरवून आणि वेळप्रसंगी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून बिरू पोलिस दलात दाखल झाले. मोठा भाऊ मंगेश यांनीही यूपीएससीच्या परीक्षा दिल्या. पण थोडक्‍यात त्यांची संधी हुकली. मात्र, बिरू यांच्या यशाने जोग कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रतिकूल परिस्थितीत आपण पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालो. आता पोलिस खात्यातील सेवेतून गोरगरिबांची सेवा करण्याची इच्छा असून आई, वडील आणि भावाचे स्वप्न साकार केल्याचे मोठे समाधान मिळाल्याचे बिरू जोग यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com