शेतकरी संघटनेचे टाळे आंदोलन स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलनाला सुरवात झाली.

शिये (कोल्हापूर) : ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन टाळे न लावता शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केले. 
शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवरकारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळीग्रामपंचायतीस संघटना टाळे ठोकणार होती. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलनाला सुरवात झाली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत कार्यकर्ते ग्रामपंचायत चौकात जमले. पूरग्रस्त कुटुंबाचे सर्व्हे नंबर 259 व 283 मधील रिकाम्या जागी पूनर्वसन व्हावे. तेथे होणारे अतिक्रमण कायदेशीर रोखावे. अशी मागणी केली. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे आपिल केले. त्यांनी ही माहिती देण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामपंचायत माहिती देत नाही. यासाठी आंदोलन करत असल्याचेही ऍड. शिंदे यांनी सांगितले.

हे पण वाचाआधी परवानगी घ्या, मगच ‘शुभमंगल’ म्हणा ! ; प्रशासनाचा निर्णय 

प्रशासक सुनीलकुमार गायकवाड व ग्रामसेवक रमेश कारंडे यांनी निवेदन स्विकारले व संघटनेला अपेक्षित पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. यावेळी उत्तम पाटील, धनाजी चौगले, उत्तम पाटील, बाबासो गोसावी, उत्तम पाटील, के. बी. खुटाळे आदी उपस्थित होते. दरम्यान सर्व पक्षीय कृती समितीने शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्जेराव काशिद यांनी पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी यादी निश्‍चित करुण जागेची मागणी महसूल विभागाकडे करावी. त्यानंतर पुनर्वसन करावे असे सांगितले. पुनर्वसनाच्या विरोधात नाही. मात्र खरोखरच पात्र लाभार्थ्यांना लाभ व्हावा अशी अपेक्षा असल्याचे सरपंच रणजित कदम यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shetkari sanghatana protest Postponed in kolhapur