शिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद

Shirol, Hatkanangle Has 26,894 Graduate, Teacher Voter Registration Kolhapur Marathi News
Shirol, Hatkanangle Has 26,894 Graduate, Teacher Voter Registration Kolhapur Marathi News

इचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी संपर्क साधून इच्छुक उमेदवारांनी सध्या अघोषित प्रचाराचा नारळ फोडल्याचे दिसून येत आहे. नोंदणीकृत मतदारांना आतापासून आपल्या बाजूने खेचण्यासाठी इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे. पदवीधर निवडणुका पुन्हा चर्चेत आल्याने मतदार नोंदणीसाठी आता अनेक जण जागे झाले आहेत. दरम्यान, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍यात 26 हजार 894 मतदारांची नोंद झाली आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील सदस्यपदाचा कालावधी जुलैमध्ये संपला. कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळासह मतदारसंघात चर्चेला आराम मिळाला होता; पण निवडणुका होण्याचे संकेत मिळाल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यांतील पदवीधर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक आहे. जिल्ह्यात हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यांतील नोंदणीकृत मतदारांची संख्या पाहता दोन्ही तालुक्‍यांतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचा प्रयत्न असणार आहे. 

पदवीधरांसह शिक्षक मतदारांच्या आतापासून इच्छुकांनी संपर्कात राहण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पदवीधरांसह महाविद्यालयात शिक्षकांमध्ये निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. मतदारसंघात इच्छुकांच्या नावाची सध्या चर्चा असली तरी प्रत्यक्ष उमेदवार घोषणेनंतरच इच्छुकांच्या हालचालींना वेग येईल; मात्र सध्या अनेक इच्छुक मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहून निवडणुकीच्या रिंगणात प्रबळ दावेदारीसाठी वातावरणनिर्मिती सुरू आहे. 

नोंदणीसाठी पुन्हा धावाधाव 
दोन टप्प्यांत सर्वाधिक मुदत देत पदवीधर नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक आणि नोंदणीही लांबली; पण पदवीधर निवडणुकीचे संकेत मिळाल्याने नोंदणीला पुन्हा प्रतिसाद मिळेल, असे चित्र आहे. या निवडणुकीसाठी उमेदवाराचा अर्ज भरायच्या मुदतीपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. 


मतदार नोंदणी 

शिरोळ 
* स्त्री *पुरुष *एकूण 
* पदवीधर *4222 *9138 *13,360 
* शिक्षक *1503 *745 *2248. 

हातकणंगले 
* स्त्री *पुरुष *एकूण 
* पदवीधर *3208 *7051 *10,259 
* शिक्षक *312 *714 *1027. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com