शिरोळ शिवसेनेच्या वतीने आशिष शेलारांच्या पुतळ्याचे दहन....

shirol taluka shivsena protests against  Ashish Shelar
shirol taluka shivsena protests against Ashish Shelar

जयसिंगपूर (कोल्हापूर) - शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एकेरी शब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा निषेध करून येथील क्रांती चौकात शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने पुतळा दहन करुन बोंब मारण्यात आली. 
     नागरिकत्व दुरुस्ती कायदा या विषयावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  भाजपाचे  आशिष शेलार यांनी एकेरी शब्द वापरला.याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निदर्शने होत आहेत.याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथील क्रांती चौकात मंगळवारी दुपारी बारा वाजता आशिष शेलार यांच्याविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्या  प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले.यावेळी तालुका प्रमुख सतीश मलमे,ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासो बिलोरे नगरसेवक पराग पाटील ग्रा.प. सदस्य मनीषा पवार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

यावेळी उप तालुका प्रमुख विकास सुतार, राजू कदम ,मंगेश चौगुले, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखा जाधव, जयसिंगपूर शहरप्रमुख अर्चना भोजने, रुपाली संकपाळ,वैशाली शिंदे, संजय काळे, रतन पडीयार, धनाजी पवार, अण्णासो  चव्हान,राजू सुतार, अरुण होगले, जयपाल कोळी, मनोज मलमे,कुबेर माने,आकाश शिंगाडे, अमोल बामने, भाऊसो रुकडे, अरुण माने शुभम मलमे यांच्यासह सह तालुक्यातील शिवसैनिक महिला आघाडी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com