शिवाजी विद्यापीठ बॅकलॉगच्या परीक्षा आजपासून

 Jewelery worth Rs 20 lakh seized from a burglar in Chandgad taluka
Jewelery worth Rs 20 lakh seized from a burglar in Chandgad taluka


कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठ बॅकलॉगच्या परीक्षा बुधवार (ता.30) पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार असून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सीसह सर्वच विद्याखाशांच्या बॅकलॉग परीक्षा होणार आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील सुमारे 30 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 9 ऑक्‍टोबरपर्यंत ही परीक्षा चालेल. 
विद्यापीठाने बॅकलॉगच्या परीक्षा गुरुवार (ता.1) ते शुक्रवार (ता.9) या कालावधीत होतील. या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने देण्याची विद्यार्थ्यांना मुभा आहे. महाविद्यालयांचे याचे नियोजन पूर्ण झाले असून उद्या (ता.1) परीक्षांना सुरवात होईल. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 30 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 
दरम्यान, लेखणी बंद आंदोलनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असून, याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत होईल. परीक्षा घेण्यासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर खरेदीच्या प्रक्रियेलाही विलंब झाला आहे. एकच प्रस्ताव आल्याने पुन्हा निवेदन प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर सॉफ्टवेअरची खरेदी होईल. तोच विद्यार्थी परीक्षा देतो आहे का? याची खात्री करण्याची सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये असावी, अशी परीक्षा विभागाची मागणी आहे. 
दरम्यान, 48 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर 8 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यास पसंती दिली आहे. 56 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली आहे. नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस होता, मात्र मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना उद्याही नोंदणी करता येणार आहे. 

बॅकलॉगच्या परीक्षा महाविद्यालयीनस्तरावर होत आहेत. परीक्षा होऊन गुण दिल्यानंतर तत्काळ हे गुण परीक्षा विभागाच्या प्रणालीमध्ये भरावेत. त्यामुळे 10 नोव्हेंबरपर्यंत या परीक्षांचे निकाल लावणे शक्‍य होईल. 
- गजानन पळसे, संचालक, परीक्षा विभाग. 

कर्मचारी संघ परीक्षांचे काम करणार 
कोल्हापूर ः परीक्षा कालावधीत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघ लेखणी बंद आंदोलनात सहभागी न होता परीक्षेच्या कामात प्रशासनाला मदत करणार आहे. या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीने सहभागी झालेल्या परीक्षा संचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी कर्मचारी संघाने केली आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. 
अंतिम वर्षाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. तसेच महासंघाने संप करणार असल्याची सूचना विद्यापीठाला दिली होती, असे असताना अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी का केली नाही. अधिकारी फोरम चुकीच्या पद्धतीने संपात सहभागी झाला आहे. त्यामुळे परीक्षा संचालक व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघ या संपात सहभागी न होता. परीक्षा घेण्याच्या कामात विद्यापीठाला मदत करेल. कर्मचारी संघाचे वसंतराव मगदूम आणि अध्यक्ष सुनील देसाई यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
- संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com