खेलो इंडियात "शिवराज'च्या खेळाडूंची बाजी 

Shivraj College Players Bet On Khelo India Kolhapur Marathi News
Shivraj College Players Bet On Khelo India Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : भुवनेश्‍वर (ओडीशा) येथे युनिव्हर्सिटी खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयातील खेळाडूंनी तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारात बाजी मारली. या विजेत्या खेळाडूंची शहरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक पदक विजेत्या खेळाडूचा महाविद्यालयातर्फे रोख अकरा हजाराचे बक्षीस देवून गौरव करण्यात आला. 

राष्ट्रगीताने मिरवणुकीची सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात क्रीडाशिक्षक राहूल मगदूम यांनी स्वागत केले. खेलो इंडियामधये तलवारबाजीतील विजेता प्रथमकुमार शिंदे (दोन रौप्य), विपूल येडेकर (दोन कास्य), धनंजय जाधव (एक रौप्य), कुस्तीमध्ये रोहन रंडे (सुवर्णपदक)ख राष्ट्रीय वेटलीफ्टिंग स्पर्धेतील विजेता अक्षय वाळके (सुवर्णपदक) या खेळाडूंसह मार्गदर्शक क्रीडाशिक्षक प्रा. मगदूम, प्रा. जयवंत पाटील, विरेंदर कौर-अडसुळे व पालकांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रा. अनिल कुराडे, प्र. प्राचार्य डॉ. बी. जे. देसाई यांच्या हस्ते झाला. 

महाविद्यालयापासून सुरू झालेली खेळाडूंची मिरवणूक कडगाव रोड, मुख्य रस्ता, वीरशैव चौक, नेहरू चौक, लक्ष्मी रोड, मेन रोड, चर्च रोडवरून यशवंत बझारसमोर सांगता झाली. हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत निघालेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. फेटे बांधलेल्या खेळाडूंना सजवलेल्या मोटारीमध्ये बसविले होते. मार्गदर्शक शिक्षकांनाही फेटे बांधले होते. मिरवणुकीत प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले.

मिरवणूक मार्गातील महात्मा बसवेश्‍वर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अर्बन बॅंकेचे अध्यक्ष ऍड. व्ही. एस. पाटील, आण्णाराव आजरी, विजय मोरे, उद्योजक सुनील चौगुले, महेश पाटणे, अजित चोथे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. के. ए. सावेकर, संचालक बसवराज आजरी, महेश तुरबतमठ, विश्‍वजित कुराडे, अक्षय कित्तूरकर, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. तानाजी चौगुले, डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनमोहन राजे यांनी आभार मानले. 

गौरवशाली परंपरेत भर
महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत या खेळाडूंनी मोलाची भर घातली आहे. हे खेळाडू शिवराजचा अभिमान आहेत. या खेळाडूंनी आता ऑलीम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने तयारी करावी. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाने खेळाडूंना प्रोत्साहनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. गडहिंग्लज उपविभागात प्रथमच खेलो इंडियाची पदके जिंकण्याचा मान शिवराजने पटकावला आहे. 
- प्रा. अनिल कुराडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com