सहा जूनला 'असा' साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा...

 shivrajyabhishek ceremony will be celebrated simply
shivrajyabhishek ceremony will be celebrated simply

कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सहा जूनला साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे दिली. शिवभक्तांनी स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे  पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा व शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा कसा होणार, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत संभाजीराजे यांनी शिवभक्तांशी संवाद साधत सोहळ्याची माहिती दिली.

संभाजीराजे म्हणाले, "शिवभक्तांच्या सहकार्याने २००८ ला मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात. यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाज हीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. साधेपणाने सोहळा साजरा होईल."

रायगडावर येण्याचा मोह टाळावा

शिवरायांचा मावळा शिस्तबद्ध व आज्ञाधारक आहे, हे दाखविण्याची हीच वेळ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवभक्त घरीच राहून यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतील.‌ त्यांनी कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा मोह टाळावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com