चंदगडला साकारतेय शिवशक्तीस्थान 

Shivshakthistan Build In Chandgad Kolhapur Marathi News
Shivshakthistan Build In Chandgad Kolhapur Marathi News

चंदगड : मन आणि मनगट बळकट असणे हे जसे व्यक्तीचे तसेच ते समाजाच्या सदृढतेचे लक्षण आहे. सुसंस्कारी आणि ताकदवान समाज निर्मिती करणे हा छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन येथील तरुणांनी स्मारक उभारणीचे काम हाती घेतले आहे. शिवरायांची मूर्ती तर उभी केली जाणार आहेच परंतु मन, मनगट बळकट करणारी तालिम त्यात सामावून घेतली जात आहे. बहुतांश काम पूर्ण झाले आहे. स्मारक हा शब्द मर्यादित असल्याने व्यापक अर्थाने शिवशक्तीस्थान असे संबोधले जाते. यावरुन त्याचे महत्व लक्षात येते. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी माणसांचे स्फूर्तीस्थान. त्यांच्या विषयीचे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी पुतळे उभारण्यात आले आहेत. अर्ध पुतळ्यापासून ते अश्‍वारुढ, उभ्या अवस्थेतील पुतळे पहायला मिळतात. गत वर्षी शहरात शिवरायांचे स्मारक उभारणीचा निर्णय झाला. परंतु ते कसे असावे यावर सविस्तर चर्चा झाली.

प्रत्येकाची मते आजमावण्यात आली. स्मारक म्हणजे केवळ सुशोभीकरण असे न होता शिव विचार म्हणून ते विकसित करता आले तर ते अधिक चांगले यावर सर्वांचे एकमत झाले. आर्किटेक्‍ट धनंजय वैद्य यांची मदत घेण्यात आली. पुतळ्याबरोबरच तालिम उभी करण्याचा निर्णय झाला. किल्ले रायगड व पारगड येथील माती आणून कामाची सुरवात झाली. एका बाजूला पुतळा आणि दुसऱ्या बाजूला तालिम अशी रचना ठरली.

त्यानुसार प्रत्यक्ष कामही प्रगतीपथावर आहे. खालच्या बाजूला मातीची तालिम, त्याच्या बाजूला दोन मल्लखांब बसवण्यात येणार आहेत. वरच्या मजल्यावर ऐतिहासिक माहिती देणारे संग्रहालय केले जाणार आहे. त्यात महाराष्ट्राचा इतिहास सांगणारी पुस्तके असतीलच, त्याबरोबरच स्थानिक गड-कोट, जूनी ऐतिहासिक कागदपत्रे, नाणी यासह दूर्लक्षित वस्तू, साहित्य जतन करण्याचा प्रयत्न असेल. सुमारे दिड हजार चौरस फूट क्षेत्रात हे सर्व आकाराला येत आहे. हेवेदावे विचारात न घेता काम सुरु आहे. लोकवर्गणी किती खर्च झाली यापेक्षा फलित चांगले आहे यावर नागरीकांचा विश्‍वास आहे. 

प्रत्येक कृती विचारपूर्वक..... 
तालमीच्या चौकटीवर मल्ल रुपातील श्रीकृष्णाची मूर्ती कोरली आहे. शिवरायांच्या मूळ पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी खालच्या बाजूला एक उत्सव मूर्ती बसवण्यात येणार आहे. त्यामुळे जयंती, उत्सवावेळी त्याची पुजा करता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com