धक्कादायक ः राज्यभरात एसटीचे 549 कर्मचारी कोरोनाबाधित

Shocking: 549 ST employees coronated across the state
Shocking: 549 ST employees coronated across the state

कोल्हापूर ः कोरोनाकाळात अत्यावश्‍यक सेवा म्हणून एसटी महामंडळाने राज्यभरात प्रवासी सेवा दिली. याकाळात कर्तव्य बजावणाऱ्या पैकी राज्यभरातील 549 एसटी कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 381 कर्मचारी कोरोना मुक्त झाले आहेत. उर्वरीत कर्मचारी अद्याप उपचार घेत आहेत. अशात कोल्हापूरात 12 कोरोनाबाधित आढळले त्यातील दहा जण बरे झाले आहेत. 
कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसटी महामंडळाची सार्वजनिक प्रवासी वाहतुक सेवा बंद आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळात रोजचा अर्थिक तोटा दिवसागणिक वाढत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. यात राज्य शासनाने 270 कोटी दिले. त्यावर गेल्या महिन्यांपर्यंत वेतन झाले आहे. हे वेतन 50 टक्के झाले आहे. यातून कर्मचाऱ्यांना बॅंक कर्जाचा हप्ता, अन्य बिलांची कपात होऊन एसटी कर्मचाऱ्यांना दोन ते तीन हजार रूपये वेतन मिळते. त्यातून एसटी कर्मचारी अर्थिकदृष्ठ्या हवालदिल आहे. 
अशातही एसटी महामंडळाने जिल्ह्यांर्तगत प्रवासी सेवा सुरू केली आहे. मात्र त्याला मोजक्‍या शहरात जेमतेम प्रवासी प्रतिसाद आहे. दिवसभरात एका आगारातून फार तर दहा बारा फेऱ्या होतात मात्र, मुंबईत अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी एसटी गाड्यांचा वापर झाला तर राज्यातील परप्रांतातील कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटीचा वापर झाला तर काही वेळा परराज्यातून विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठीचा वापर झाला. यासेवा एसटी कर्मचाऱ्यांनी नेटाने दिल्या. 
असे असले तरी गेल्या महिन्याभरात गावागावात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली अनेक कर्मचारी ड्युटी नसल्याने गावात होते. अशा स्थितीत काहीजन आजारी पडले. त्यांचे स्वॅब तपासणीत ते कोरोनाबाधित आढळले आहेत. अशांची राज्यभरातील संख्या 549 झाली. यात कोल्हापूरातील एसटी बारा कर्मचारी कोरोनाबाधित होते. त्या सर्वांवर सक्षम उपचार झालेत दहाजण कोरोना मुक्त झाले आहेत. 

मुंबई, ठाणे, सांगलीत कोरोनाबाधित सर्वाधिक 
एकूण 16 व्यक्तीचा मृत्यू झाला. यात मुंबईत 4 तर ठाण्यात 3 कर्मचारी मृत्यू झाला आहे. अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. मुंबई 107, ठाणे 148, रायगड 23 सांगली 65 येथे सर्वात जास्त संख्येने एसटी कर्मचारी कोरोनाबाधित सापडले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com