पाच वाजताच शटर डाउन 

 Shutter down at five o'clock
Shutter down at five o'clock

कोल्हापूर : सायंकाळी साडेचार वाजले की, व्यापारी दुकानदारांची आवराआवर सुरू होते. पाच वाजताच एकेका दुकानाचे शटर डाउन होण्यास सुरवात होते.

लॉकडाउनमुळे शहराच्या दुकानांच्या बदलत्या वेळांमुळे सायंकाळी दुकानमालकांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. 
22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे व्यापाराचे चक्र बदलून गेले. कधीतरी सणासुदीला अथवा आठवड्यातून एकदा बंद राहणारी दुकाने पावणेदोन महिने उघडली नाहीत. चार एप्रिलला दुकाने सुरू झाली. सायंकाळी सातपर्यंत ती खुली ठेवण्यास मुभा दिली. 
केवळ पार्सल देण्याची अट घातली गेली. 17 मे नंतर लॉकडाउनची मुदत वाढल्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी वेळ दिली. सकाळी नऊ ते दुपारी तीननंतर चार ते रात्री दहापर्यंत दुकाने खुली असतात. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहिली. दुकाने खुली झाल्यानंतर नव्या वेळा समोर आल्या. पंधरा दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजता दुकाने बंद झाली. आता वेळ पुन्हा अलीकडे आली. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत तरी व्यवसाय होऊ दे, या उद्देशाने सकाळपासून व्यापाऱ्यांची लगबग सुरू असते. पाचनंतर दुकाने सुरू ठेवली आणि दंड झाला, तर करायचे काय, या भीतीपोटी पाच वाजताच दुकाने बंद होऊ लागली आहेत. 
चिकन 65, चायनीज खाद्यपदार्थांची खाऊ गल्ली व राजारामपुरी येथे रात्रीपर्यंत गर्दी असायची. आता खाद्यपदार्थांची पार्सलही पाचपर्यंत मिळते. हॉटेलही शटर डाउन करूनच सुरू असतात. तेथेही केवळ पार्सलची व्यवस्था आहे. 

रंकाळा चौपाटीवरील गाड्या बंदच 
रंकाळा चौपाटी, तसेच अन्य भागातील भेळच्या गाड्या, गोबी मंच्युरी, आंबोळी, उताप्पा, पावभाजीच्या गाड्या बंद आहेत. व्यापार उद्योग म्हटले की सकाळी, तसेच सायंकाळी अशा दोन टप्प्यांत उघडल्या जाणाऱ्या दुकानांना वेळेच्या बंधनात राहूनच व्यवसाय करावा लागत आहे. सायंकाळी पाच वाजता शहराच्या कोणत्याही भागात नजर टाकल्यास दुकानदार, तसेच व्यापाऱ्यांची लगबग दिसून येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com