shikamdar shaikh mahan bharat keshri
shikamdar shaikh mahan bharat keshriSakal

सिंकदर शेख महान भारत केसरीचा मानकरी...

कोल्हापूर - हल्याळ (जि. कारवार, कर्नाटक) येथे झालेल्या महान भारत केसरी कुस्ती स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम लढतीत हिंदकेसरी सत्येंद्र मोखीयाड याच्यावर ६ -३ अशा गुणांनी मात करत गंगावेश तालमीचा मल्ल सिकंदर शेख यंदा महान भारत केसरी किताबाचा मानकरी ठरला. 

अशी जिंकली लढत

उपांत्य सामन्यात सिंकदरने हिंदकेसरी असणारा अनुभवी व तगडा मल्ल युद्धवीर राणावर २-० अशा गुणांनी विजय मिळवला. सिकंदरने या स्पर्धेत एकूण ६ कुस्त्या जिंकल्या. त्यापैकी पाच कुस्त्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार मॅटवर तर अंतिम कुस्ती ही मातीत खेळून जिंकली. या वेळी विजेत्या सिकंदर शेख याला २ लाख २२ हजार रुपये रोख आणि मानाची चांदीची गदा व महान भारत केसरी किताब देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी भारतातील २२ राज्यातील पैलवानांनी सहभाग नोंदवला होता.

अशी होती गुणदान पद्धत

सदर स्पर्धेतील सेमी फायनल राउंड पर्यंतच्या लढती मॅट वर घेण्यात आलेल्या होत्या तर अंतिम लढत मातीमध्ये घेण्यात आली. ज्यामध्ये वीस मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या वीस मिनिटात जो सर्वाधिक गुण वसूल करेल किंवा चितपट कुस्ती करेल त्याला विजय देण्यात आला.अशा नियमानुसार संपूर्ण कुस्ती स्पर्धा पार पडली.

गंगावेश तालीमीची चौथ्यांदा गदा
- दिनानाथ सिंह  
- माऊली जमदाडे -  २०१७
- योगेश बोंबाळे  - २०१८
- सिंकदर शेख - २०२०

सिकंदर मुळचा मोहोळचा

मुळचा मोहोळ (जि.सोलापूर) असणारा सिकंदर कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेशमध्ये वस्ताद विश्‍वास हारुगले व हिंदकेसरी दिनानाथसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे सराव करत आहे. नुकताच तो भारतीय लष्करात भरती झाला असुन पुण्यातील खडकी येथे त्याला सुभेदार सोपान शिंगाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मला पराभवाचा सामना करावा लागला.मात्र ’महान भारत केसरी’ सारख्या मानाच्या स्पर्धेत मला विजय प्राप्त झाला.हा किताब मी माझे वस्ताद विश्‍वास हारुगले यांना समर्पित करतो. 
- पै.सिंकदर शेख

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com