कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; सायंकाळपर्यंत तब्बल ३९० जण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे बेडचा तुटवडा जाणवत आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढीचा जोर अद्याप सुरू असून, आज सायंकाळपर्यंत ३९० नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या सहा हजार ८५  झाली आहे. आजवर एकूण दोन हजार २७६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण तीन हजार २६२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर काल दिवसभरात ११ बाधितांचे मृत्यू झाले. दिवसभरात १३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे बेडचा तुटवडा जाणवत आहे. ग्रामीण भागात केलेल्या शासकीय रुग्णालयात सोयीनुसार जवळपास २०० हून अधिक जादा बेडचाही आधार घ्यावा लागला. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसभरात आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींवर त्या-त्या तालुक्‍यात उपचार सुरू झाले. प्रकृती गंभीर आहे, अशांनाच उपजिल्हा रुग्णालय तसेच ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले.  उपचार घेणाऱ्या बाधितांत एकूण ४२ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीत ९६५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचे अहवाल दोन दिवसांत मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय विभागाने दिली. 

हे पण वाचा कोल्हापूरच्या घरांमध्ये कशी आली लाईट ? वाचा लाईटची अनटोल्ड स्टोरी...

 
एकूण कोरोनाग्रस्त ---  ६ हजार ८५  
एकूण कोरोनामुक्त ---- २ हजार २७६    
आजअखेरचे मृत्यू -------  १५७
सध्या उपचार घेणारे  ----३ हजार २६२  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six thousand crores for corona positive in kolhapur