esakal | वीर पत्नीचा प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा 

बोलून बातमी शोधा

soldiers wife warning of self-immolation on Republic Day}

गडहिंग्लज येथील वृषाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर 2001 ला अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात शहीद झाले

वीर पत्नीचा प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पती शहीद होऊनही त्यांच्या नावे दिलेला प्लॉट मिळण्यासाठी 14 वर्षे संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला कंटाळून 26 जानेवारीला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा वीर पत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

गडहिंग्लज येथील वृषाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर 2001 ला अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात शहीद झाले. याबद्दल शासनाने त्यांना बड्याचीवाडी (ता. गडहिग्लज) येथील विजयनगर येथे 2007 मध्ये दोन गुंठ्याचा प्लॉट दिला. 2008 ला बांधकाम करण्यासाठी वृषाली तोरस्कर यांनी साहित्य आणले. बांधकामाला सुरुवात झाली. निम्मे बांधकाम झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी विरोध केला. बांधकाम थांबविले.

हे पण वाचाVideo : ...तर महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य होईल

या प्रकरणी तोरस्कर यांनी विजय मिळवला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला; मात्र पुन्हा बांधकाम करण्यास स्थानिक काही लोक विरोध करत आहेत. त्या म्हणाल्या, ""पूर्वी विरोध असलेला कमी होऊनही सध्या दोन लोकच विरोध करत आहेत. माझ्याबरोबर दुसऱ्या वीरपत्नीला त्याच ठिकाणी प्लॉट मिळाला. त्याचे बांधकामही पूर्ण झाले; मात्र मला त्या ठिकाणी बांधकामास विरोध केला जातो.'' या जागेवर कोणतेही आरक्षण नसताना न्यायालयीन स्थगिती देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. 
 

हे पण वाचा - नव्या मतदारांना मिळणार पीव्हीसी कार्ड

संपादन - धनाजी सुर्वे