कोल्हापूरकरांनो जागा संपली,  विकास होणार कोठे?

Space limit for development schemes e city limits are not extended kolhapur
Space limit for development schemes e city limits are not extended kolhapur

कोल्हापूर:  शहराची हद्दवाढ न झाल्याने विकास योजनांसाठी जागेची मर्यादा आहे. शहराचा विस्तार हा क्षितिज समांतर (आडवा) न होता, तो उभा होऊ लागला. त्यातून वाहतूक कोंडी, आपत्ती व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी निर्मूलन अशा नागरी समस्या तयार झाल्या. एका विशिष्ट भागावर लोकसंख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला. रहिवासी भाग, ऐतिहासिक वास्तू, आरक्षित जागा, जलस्त्रोत, शासकीय इमारती या सगळ्यांमुळे शहरातील विकासासाठी जागाच संपली. याचा त्रोटक उल्लेख महापालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावात आहे. यात कोणतीही सांख्यिकी नाही. 

महापालिकेने ११ जून २०१५ ला विशेष सभा घेऊन २० गावांचा उल्लेख असणारा प्रस्ताव (ठराव क्रमांक २६६) मान्य केला. हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवला.  प्रस्तावात शहरातील जागेच्या मर्यादेचा उल्लेख आहे; पण त्रोटक असून, त्यात सांख्यिकी माहिती नाही. महापालिका हद्दीत ५४ बागा असून ३५०० एकर जागा खर्च झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचा ८५६ एकर परिसर आहे. याशिवाय टी. ए. बटालियन, कृषी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, राजाराम महाविद्यालय, आयएएस ट्रेनिंग सेंटर हा परिसरही मोठा आहे. ९ मोठी मैदाने आहेत. 

अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस यांसारख्या मोठ्या आणि अन्य लहान अशा ७४ ऐतिहासिक वास्तू आहेत. ६ तलाव आहेत. जयंती आणि गोमती नद्यांच्या काठावरचे क्षेत्र आहे. याशिवाय पूरक्षेत्रातील परिसर, टेकड्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पाण्याच्या टाक्‍या यामध्ये जागा उपयोगात आली आहे. या जागा उपयोगात आल्याने तेथे कोणतेही बांधकाम शक्‍य नाही. याशिवाय किरणोत्सव मार्गातही बांधकामाला मर्यादा आहेत. शहरातील एकूण क्षेत्रफळापैकी केवळ १ टक्‍क्‍याहून कमी जागा विकास योजनांसाठी शिल्लक आहे. विस्ताराला मर्यादा असल्याने आडवी क्षितिजासमांतर होणारी वाढ थांबली व उभी वाढ सुरू झाली. इमारती उभ्या राहिल्या. गावभागात जागेच्या अभावाने त्यांच्याही रुंदीला मर्यादा आल्या. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com