संसाराच्या गाड्यासह 'ती' चालवितेय रूग्णांची जीवनदायीनी

मिलिंद देसाई
Monday, 14 September 2020

कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांसह इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

बेळगाव : कोरोनाच्या संकट काळात अनेकजण आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र शहरातील एक महिला रुग्णांना रुग्णालयात वेळेत दाखल करण्यासाठी धडपडत आहे. स्वत : रुग्णवाहीका चालवीत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत याकडे लक्ष देणाऱ्या माधुरी जाधव या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांसह इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात पोहचविण्यासाठी रुग्णवाहीकांनाही मोठी मागणी वाढली आहे. मात्र अनेकदा रुग्णवाहीका वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याची दखल घेऊन माधुरी जाधव यांनी रुग्णवाहीका चालविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या हेल्प फॉर निडी संस्थेचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या कार्याशी जोडले गेल्यानंतर जाधव यांनी सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे नातेवाईक देखील रुग्णांजवळ जाण्यास घाबरत असताना जाधव या मोठ्या धाडसाने रुग्णांच्या मदतीला जात असतात. 

हेल्प फॉर निडी संस्थेकडे सध्या दोन रुग्णवाहीका आहेत. यापैकी एक रुग्णवाहीका चालविण्याची जबाबदारी जाधव यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणी रुग्णांची येजा करण्यास मदत होत आहे. महिला आहे म्हणून घरात घाबरुन न बसता नागरिकांच्या मदतीसाठी जाधव यांनी हाती घेतलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

हे पण वाचा -  आण्णा तुम्ही जा... मायला, बारक्‍याला सांभाळा

 

हेल्प फॉर निडी संस्थेबरोबर कार्य करण्यास सुरुवात केल्यापासून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अनेकदा रुग्णांवर वेळेत उपचार होणे आवश्‍यक असते. त्यामुळे रुग्णवाहिका स्वत: चावलत रुग्णांना दवाखान्यात पोहचविण्याचे काम करीत आहेत. याला संस्थेचे सहकार्य मिळत आहे. 

-माधुरी जाधव

हे पण वाचामराठा समाजाला आरक्षण देणारच! या मंत्र्याने दिली ग्वाही

 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story on ambulance driver of women