लोकांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी बुवावर कठोर कारवाई करण्याची मागणी 

Statement to the Deputy Superintendent of Police of the Anti Superstition Committee
Statement to the Deputy Superintendent of Police of the Anti Superstition Committee

गडहिंग्लज : सिरसंगी (ता. आजरा) येथील ढोंगी बुवा बाळू दळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या दळवीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. पोलिस उपअधीक्षकांना मागणीचे निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, संतांचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. गृहशांती, संतती होणे, गुप्त धन मिळणे आदींवर तोडगा काढून देतो, असे भासवून बाळू दळवी लोकांची फसवणूक करीत होता. अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अत्याचार करीत होता. या ढोंगी नराधमाला अटक झाली आहे. पण, जादूटोणा प्रतिबंध कायद्याखाली कठोर कारवाई करावी. तसेच लोकांच्या फसवणुकीतून दळवीने मिळविलेल्या संपत्तीची चौकशी करावी. 

पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी निवेदन स्वीकारले. अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, रमजान अत्तार, प्रा. शिवाजी होडगे, अशोक मोहिते, पांडूरंग करबंळकर, अलका भोईटे, सुवर्णलता गोईलकर, गणपतराव पाटोळे, प्रा. पी. डी. पाटील यांनी हे निवेदन दिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com